Photos : अडीच मिनिटांचा व्हिडीओ अन् 9 ‘अतरंगी’ ड्रेस, लेडी गागाचे वोटिंग अपील होतेय वायरल

वॉशिंग्टन : कोरोना महामारीदरम्यान अमेरिकेत मतदान होत आहे आणि यावेळी विक्रमी मतदान दिसून येत आहे. 3 नोव्हेंबरनंतर निर्णय होईल अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष कोण असेल. या दरम्यान अमेरिकेची प्रसिद्ध सिंगर, परफॉर्मर आणि अ‍ॅक्टर लेडी गागाने एक व्हिडिओच्या आधारे आपल्या वेगळ्या शैलीत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

या अडीच मिनिटाच्या व्हिडिओत लेडी गागाने त्या लोकांसाठी टाळ्या वाजवल्या, ज्यांनी मतदान केले आहे. तिने या व्हिडिओत त्या लोकांबद्दल मत मांडले आहे ज्यांनी अजूनपर्यंत मत दिलेले नाही आणि जे इलेक्शनबाबत निराशावादी भूमिकेत आहेत.

तिने या व्हिडिओत म्हटले आहे की, मला त्या लोकांशी बोलायचे आहे, जे मतदान करण्याचा सध्या प्लॅन करत नाहीत, कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत शकत नाहीत, किंवा ज्या लोकांचा मतदान यंत्रणेवर विश्वास नाही. मला वाटते की, तुम्हाला इलेक्शनबाबत काहीही वाटत असले तरी मत देणे तुमची जबाबदारी आहे.

तिने पुढे म्हटले आहे की, तुम्ही प्रोटेस्ट्स आणि कोरोनामुळे पूर्णपणे फ्रस्ट्रेट झाला आहात, किंवा तुम्हाला कोणताही उमेदवार पसंत नसेल किंवा असेही होऊ शकते की देशाची स्थिती पाहून तुम्ही नाउमेद झाला असाल, किंवा वोटिंगबाबत तुमचा विश्वास उडाला असेल आणि तुम्हाला सिस्टमचा भाग बनायचे नसेल.

लेडी गागाने पुढे म्हटले आहे, परंतु जर तुम्हाला ही सिस्टम बदलायची आहे आणि जर तुम्हाला तुमचा देश पहिल्यापेक्षा आणखी चांगला पहायचा असेल तर तुम्हाला निवडणुकती सहभागी व्हावे लागेल. जेव्हा याबाबत घोषणा होईल की, कुणी निवडणूक जिंकली आहे, तेव्हा स्पष्ट होईल की, आपला देश काय होणार आहे.

लेडी गागाने म्हटले, सरकारचे शासन कधीही हटणारे नाही आणि जोपर्यंत तुमच्याकडे इतर कोणत्याही देशात जाण्याचा प्लॅन नाही, हा देशच तुमचे घर असणार आहे. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, तुम्हाला काहीही वाटत असले तरी तुमचे भविष्य तुमच्या मतदानावर अवलंबून आहे.

तिने व्हिडिओच्या शेवटी म्हटले की, मी अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये वेगवेगळ्या अंदाजात सांगितल्या आहेत. स्टेजवर ओरडणे, स्टेडियममध्ये उड्या मारणे, वेगळा मेकअप करणार्‍यासारख्या अनेक गोष्टी. काही वर्षात माझ्या पर्सनॅलिटीत बदल सुद्धा झाला आहे, परंतु एक गोष्ट अजिबात बदलली नाही, ती म्हणजे माझा आवाज. आणि माझा जगाबाबतचा दृष्टीकोन आणि विश्वास. माझा आवाज यावेळी निवडणुकीत ऐकायला येईल. तुमचा सुद्धा येईल का?

या व्हिडिओत लेडी गागा अनेक मनोरंजक आणि वादग्रस्त आउटफिट्समध्ये दिसत आहे. तिने 2010च्या एमटीव्ही व्हीएमए अवॉर्डमध्ये घातलेल्या आपल्या वादग्रस्त मीट ड्रेस, 2017 मध्ये घातलेल्या सुपरबाउल बॉडीसूट, क्रोमॅटिक टी-शर्ट, आयकॉनिक काऊबॉय हॅट आणि पोकर फेस म्यूझिक व्हिडिओच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.