Mutual Fund Investment | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या Alpha आणि Beta काय असतं?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund Investment) करण्याचा ट्रेंड झपाट्याने बदलत आहे. जर तुम्ही शेअर बाजार (Stock Market) किंवा म्युच्युअल फंडातही गुंतवणूक (Mutual Fund Investment) करत असाल तर तुम्हाला काही मुलभूत गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. अल्फा (Alpha) आणि बीटा (Beta) याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हे गणितातील अल्फा-बीटा नसून म्युच्युअल फंडाच्या अल्फा आणि बीटा आहेत.

 

जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एखादा फंड निवडाला तर त्याचे पाच निर्देशक आहेत. जसे अल्फा, बीटा, आर स्केअर (R scare), स्टॅण्डर्ड डेव्हिएशन (Standard Deviation) आणि शार्प रेशो. आज तुल्हाला अल्फा आणि बीटा बद्दल माहीती देणार असून त्याची गणती करुन तुम्ही फंडाचा परतावा कसा काढू शकता.

 

अल्फा काय आहे ?
अल्पा एखादा फंडाची कामगिरी दाखवतो. म्युच्युअल फंडामध्ये, अल्फा फक्त बेंचमार्क (Benchmark) निर्देशांक पेक्षा फंडाने किती जास्त किंवा कमी परतावा दिला आहे हे दाखवते. हे एका उदाहरणाने समजून घेऊ. सजमा तुम्ही एखाद्या फंडात गुंतवणूक (Mutual Fund Investment) केली आहे आणि त्या फंडाचा बेंचमार्क 20 टक्के आहे आणि त्या फंडाने 25 टक्के परतावा दिला आहे, तर याचा अर्थ त्याचा अल्फा म्हणजेच कामगिरी 5 टक्के जास्त आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या फंड मॅनेजरने तुमचे फंड उत्तम प्रकारे व्यवस्थापित केले आहेत. कारण परतावा बेंचमार्क पेक्षा जास्त आहे.

याउलट जर बेंचमार्क 20 टक्के असेल आणि फंडाने 15 टक्के परतावा दिला असेल, तर त्याने त्याच्या अपेक्षेपेक्षा 5 टक्के कमी परतावा दिला आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही गुंतवणूक करायला जाल जेव्हा त्याचा अल्फा जास्त आहे का हे नक्की पहा. अल्फा जितका नकारात्मक असेल तितकी परिस्थिती वाईट होईल आणि ती जितकी जास्त राहील तितकी परिस्थिती चांगली होईल.

 

जर म्युच्युअल फंडाचा सकारात्मक अल्फा 2 टक्के असेल, तर याचा अर्थ असा की त्याने बेंचमार्क निर्देशांक पेक्षा 2 टक्के अधिक परतावा (More Returns) दिला आहे. दुसरीकडे, जर त्या फंडाचा अल्फा -2 टक्के दाखवत असेल तर फंडाने नकारात्मक परतावा दिला आहे. पॉझिटिव्ह अल्फा (Positive Alpha) म्हणजे त्याचा फंड मॅनेजरने (Fund Manager) चांगले काम केले आहे. तुम्ही पॉझिटिव्ह अल्फा पाहून तुम्ही फंड निवडू शकता आणि तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज (Manage Portfolio) करु शकता.

बीटा काय आहे ?
बीटा फंडाच्या अस्थिरतेचा संदर्भ देते. म्युच्युअल फंड बाजाराच्या हालचालीसाठी किती सेन्सिटिव्ह आहे हे बीटा दाखवते.
म्हणजेच ते किती उंच किंवा खालपर्यंत जाऊ शकते. जर बीटा नकारात्मक असेल तर अस्थिरता कमी असते.
जर बीटा सकारात्मक (Beta Positive) असेल तर अस्थिरता अधिक असते.
आम्ही म्युच्युअल फंडातील बीटाचा बेंचमार्क मानतो. जर त्याच बेंचमार्क एकापेक्षा जास्त असेल तर तो अधिक अस्थिर असतो आणि जर तो एकापेक्षा कमी असेल तर तो कमी अस्थिर असतो, जोखीम कमी असते.
ज्यावेळी वैधता जास्त असते तेव्हा नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. मात्र परतावा मिळण्याची शक्यता देखील वाढते.

 

तुम्हाला कोणत्याही AMC मध्ये गुंतवणूक करायची असल्यास, प्रथम त्याचे बीटा मूल्य तपासा.
बीटा मूल्य कधीही एकापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच ते वजा किंवा एकापेक्षा कमी असावे.
त्यामुळे जर बीटा एकापेक्षा कमी असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. कारण तिथे तुमचा धोका कमी होते.
तुम्हाला जरा कमी रिटर्न नक्कीच मिळतो. मात्र धोका कमी होता.

 

Web Title :- Mutual Fund Investment | learn basics before investing in a mutual fund what are alpha and beta

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा