MVA Mahamorcha | लवकरच महाविकास आघाडीचा मुंबईत विराट महामोर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने (MVA Mahamorcha) येत्या 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट महामोर्चाचे (MVA Mahamorcha) आयोजन केले आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीची सोमवारी मुंबईत अजित पवारांच्या घरी एक बैठक पार पडली. यावेळी 17 डिसेंबर रोजी मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. ठाकरेंनी विविध घडामोडींवर भाष्य केले. भाजप आणि शिंदे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फोडण्याचा डाव आखत आहे, सातत्याने महाराष्ट्राची अवहेलना केली जात आहे. फुटीरतेची बीजे इथे रोवली जात आहेत, असे ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीमधील तीन प्रमुख पक्षांची बैठक यावेळी पार पडली. या तिन्ही पक्षांनी आगामी काळात एकजूट दाखवण्याची ठरवले आहे. हिवाळी अधिवेशनाआधी 17 डिसेंबर रोजी मुंबईत अतिभव्य महामोर्चा (MVA Mahamorcha) काढण्यात येणार आहे.

 

भायखळातील राणीची बाग म्हणजे जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा विराट महामोर्चा निघणार आहे. महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही त्यांनी येथे एकत्र यावे, महाराष्ट्रद्वेशांना धडा शिकवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केले आहे.

विराट मोर्चामध्ये तिन्ही पक्ष एकत्र येणारच आहेत. शिवाय समजावादी पक्ष, शेकाप आणि इतर घटक पक्षांशी आम्ही चर्चा केली आहे.
तेदेखील सहभागी होणार आहेत. 8 तारखेला पुन्हा सगळ्यांसोबत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना बाजूला केले पाहिजे.
पण, दरम्यान राज्यपालांना हटवले तरी मोर्चा हा निघणारच, असे यावेळी अजित पवार यांनी नमूद केले.

 

हिवाळी अधिवेशनात शिंदे सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे.
त्यात राज्यपालांपासून भाजपच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांवर अपमानकारक वक्तव्ये केली आहेत.
त्यांचादेखील समाचार विधानसभेत घेतला जाणार आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आदी मुद्दे तर महाविकास आघाडीकडे आहेत.
त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन आणि महाविकास आघाडीचा विराट महामोर्चा वादळी होणार यात शंका नाही.

 

Web Title :- MVA Mahamorcha | maha vikas aghadi mahamorcha 17 dec ncp shivsena congress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या