MVA Vajramuth Sabha | पुलवामा हल्ल्यातील RDX नागपूरमधून गेले, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये दुसरी वज्रमूठ सभा (MVA Vajramuth Sabha) झाली. या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. या वज्रमूठ सभेला (MVA Vajramuth Sabha) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) उपस्थित होते.

 

नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून राज्यात कॉमेडी शो सुरु असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. संभाजीनगरमधील दोन गटांच्या वादात पोलिसांकडून मुद्दाम दुर्लक्ष झाल्याचा आरोप पटोले यांनी केला. नागपुरातील सभेच्या (MVA Vajramuth Sabha) जागेचा वाद निर्माण करण्यात आला. भाजप का घाबरतं? अशी विचारणा त्यांनी केली. देशातील महागडे शहर नागपूर असल्याचे ते म्हणाले. जे काही आणलं ते सगळं कर्जातून आणलं आहे. जनतेच्या खिशातून पैसे लुटले जात आहे. नागपूरकरांना लुटलं जात आहे. पिण्याचे पाणी दिलं जात नाही. नागपुरात भयावह परिस्थिती असल्याचे पटोले म्हणाले.

 

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Former Governor of Jammu and Kashmir Satya Pal Malik) त्यांनी खळबळजनक दावे केले आहेत.
पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात (Pulwama Attack) सीआरपीएफचे (CRPF) 40 जवान मारले गेले होते.
या जवानांचे मृत्यू सरकारचे अपयश म्हणत त्यांनी मोदींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
यावरुन नाना पटोले खळबळजनक विधान केलं.

 

पुलवामामध्ये सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील आरडीएक्स (RDX) हे नागपूरमधून गेले होते.
असा खळबळझनक दावा नाना पटोले यांनी केला. नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) राजधानी मानली जाते.
तिथेच पटोले यांनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. पुलवामा हल्ल्यासाठी 300 किलो आरडीएक्स वापरण्यात आले होते.

 

Web Title :-  MVA Vajramuth Sabha | mahavikas aghadi vajramooth sabha congress maharashtra president nana patole hit out bjp on pulwama attack rdx

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | राज्यातील सरकार स्थिर…, अजित पवारांच्या विधानावर जयंत पाटील म्हणाले…

MVA Vajramuth Sabha | ‘वज्रमूठ सभे आधीच काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर’, ‘या’ दिग्गज नेत्याची दांडी

BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Maharashtra Political News | अजित पवारांसह ‘या’ दोन नेत्यांची अमित शहांबरोबर बैठक झाली, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा