MVA Vajramuth Sabha | ‘सच्च्या समाजसेवकासमोर तुम्हाला झुकावंच लागलं’, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘सत्तेची नशा…’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – MVA Vajramuth Sabha | ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Padmashri Dr. Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर शिवसेना Shivsena (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य करताना अमित शहांवर हल्लाबोल केला. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला तरी, सच्चा समाजसेवकासमोर झुकावंच लागते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते नागपूरमध्ये झालेल्या वज्रमूठ सभेत (MVA Vajramuth Sabha) बोलत होते.

 

उद्धव ठाकरे म्हणाले, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ही आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण, हा पुरस्कार देणारे देशभर घराणेशाहीच्या विरोधात बोंबलत आहेत. मात्र, त्यांना एका समाजसेवा करणाऱ्या घराण्यासमोर झुकावं लागलं. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला, तरी समोर सच्चा समाजसेवक (Social Worker) असल्यावर झुकावंच लागेल, हे महाराष्ट्राने आज संपूर्ण देशाला दाखवून दिलं आहे. (MVA Vajramuth Sabha)

 

धर्माधिकारी घराण्याची एक परंपरा असून, ते व्यसनमुक्तीचे काम करतात. दारु आणि अंमली पदार्थाचे व्यसन वाईट असते. तसेच सत्तेची नशा सुद्धा असते. दारुचे व्यसन एक घर उद्धवस्त करते. तर सत्तेची नशा पूर्ण देश उद्धवस्त करते, हे आपण भोगत आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेतून मोदी सरकारवर (Modi Government) टीकास्त्र सोडलं.

उलट्या पायाचं सरकार
उलट्या पायचं सरकार आलं आणि सतत गारपीट होत आहे. हे सरकार अवकाळी आहे. अयोध्येला मी देखील गेलो होतो. ती वेळ वेगळी होती. राम मंदिराचा (Ram mandir) मुद्दा कोर्टात होता. आधी राम मंदिर मग सरकार, आम्ही मोदींना सांगितलं. मोदी म्हणाले आता नको. आता हे टिकोजीराव फणा काढतोय. हे रामभक्त असते तर सुरतला नाही तर अयोध्येला गेले असता. आत्ताचे उपमुख्यमंत्री आधी कधी अयोध्येला गेले नाहीत. माझा शर्ट अधिक भगवा दाखवण्यासाठी गेले, अशी टीका ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली.

 

मी पहिल्या पाचमध्ये आलो
राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडतोय, गारपीट होतेय. अवकाळी पाऊस पडला आणि शेतकऱ्यांच्या सोन्या सारख्या पिकाचं नुकसान झालं. पंचनामा करायला देखील सरकारी अधिकारी वेळेवर जात नाहीत. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) होतं, त्यावेळी शेतकऱ्यांच्या हातात कमीत कमी वेळेत मदत पोहोचवली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काम करायचं असेल तर कुठूनही करु शकतो. नुसतंच वण वण फिरल्यावर काम होतं, असं नसतं. मी घरात बसलो म्हणून अनेक जण टीका करत होते, पण मुख्यमंत्री म्हणून मी पहिल्या पाचमध्ये आलो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

मर्द असाल तर मैदानात या
भाजप नेते चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) जे बोलले ते तुम्हाला पटतंय का? शिवसेनाप्रमुखांचं योगदान नाकारता असा सवाल ठाकरे यांनी केला. मर्द असाल तर मैदानात या, मैदान मिळू नये म्हणून काड्या कशाला घालता. जनता जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गोमुत्र शिंपडता त्यापेक्षा प्राशन करा
मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो. तुम्ही तुमच्या वडिलांचे नाव घेऊन मैदानात या. आम्ही काँग्रेसबरोबर (Congress) का गेलो?
आम्हाला कोणी घालवलं? मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदूत्व सोडलं बोलतात. मला संघाला (RSS) विचारायचं आहे
की, नेमकं तुमचं चालल्य काय? आमचं शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही. त्यांचं हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे.
गोमुत्र शिंपडता त्यापेक्षा थोडं प्राशन करा, अक्कल येईल. ते शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व (Hindutva) नाकारत आहेत.
मोहन भागवत (Mohan Bhagwat) मशिदीत जाऊन आले.
एका बाजूला हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणायची आणि मशिदीत जाऊन कव्वाली ऐकणार.
हे यांचं हिंदुत्व आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

 

Web Title :- MVA Vajramuth Sabha | mva in nagpurif not balasaheb at the time of babri then did your uncle go harsh criticism of uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | राज्यातील सरकार स्थिर…, अजित पवारांच्या विधानावर जयंत पाटील म्हणाले…

MVA Vajramuth Sabha | ‘वज्रमूठ सभे आधीच काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर’, ‘या’ दिग्गज नेत्याची दांडी

BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Maharashtra Political News | अजित पवारांसह ‘या’ दोन नेत्यांची अमित शहांबरोबर बैठक झाली, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा