500 रूपयांपेक्षा स्वस्त Airtel चे प्लॅन, मिळणार 2GB पेक्षा अधिक डाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनामुळे लोक सध्या घरातच अधिक वेळ घालवत आहेत. त्यामुळे त्यांचा मोबाईल डाटा वरील खर्च देखील वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला Airtel चे असे काही प्रीपेड प्लॅन सांगणार आहोत जे 500 रुपयांपेक्षा स्वस्त असून त्यासोबत रोज 2GB पेक्षा अधिक डाटा मिळणार आहे. जर तुम्हाला अधिक डाटा हवा असेल तर नक्की या प्लॅन कडे लक्ष द्या.

298 रुपयांचा प्लॅन

2 GB प्रति दिन डाटा ऑफर देणाऱ्या सर्व प्लॅनपैकी हा प्लॅन सर्वात स्वस्त असून तो 28 दिवसांसाठी असणार आहे ज्यामध्ये ग्राहकांना रोजचा 2GB पेक्षा अधिक डाटा मिळणार आहे. रोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉल्स सोबत एक्सट्रीम प्रीमियम बेनिफिट्स, मोफत हॅलो ट्यून, फास्टटॅग वर 150 रुपयांचा कॅशबॅक आणि फ्री ऑनलाईन कोर्सची सुविधा देण्यात आली आहे.

349 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची व्हॅलीडीटी 28 दिवसांची आहे ज्यामध्ये ग्राहकांना प्रति दिन 2GB डाटा दिला जात आहे. रोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉल्स सोबत एक्सट्रीम प्रीमियम बेनिफिट्स, मोफत हॅलो ट्यून, फास्टटॅग वर 150 रुपयांचा कॅशबॅक अशा सुविधा दिल्या जाणार आहेत.

448 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची व्हॅलीडीटी 28 दिवसांची आहे ज्यामध्ये ग्राहकांना प्रति दिन 3GB डाटा दिला जात आहे. रोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉल्स सोबत एक्सट्रीम प्रीमियम बेनिफिट्स, मोफत हॅलो ट्यून, फास्टटॅग वर 150 रुपयांचा कॅशबॅक आणि फ्री ऑनलाईन कोर्सची सुविधा देण्यात आली आहे.

449 रुपयांचा प्लॅन

या प्लॅन मध्ये ग्राहकांना रोज 2GB डाटा दिला जात असून प्लॅनची व्हॅलिडीटी 56 दिवसाची आहे. रोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉल्स सोबत एक्सट्रीम प्रीमियम बेनिफिट्स, मोफत हॅलो ट्यून, फास्टटॅग वर 150 रुपयांचा कॅशबॅक आणि फ्री ऑनलाईन कोर्सची सुविधा देण्यात आली आहे.