ठेकेदाराच्या प्रतापामुळे कुकडी कॅनॉलच्या साईडपट्टीस धोका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ठेकेदाराच्या प्रतापामुळे कुकडी कॅनॉलच्या साईडपट्टीस धोका निर्माण झाला आहे. एका रस्त्याच्या कामासाठी चक्क ठेकेदाराने कुकडी कॅनॉलच्या साईडपट्ट्याचे अवैधरित्या उत्खनन करुन दगड, माती व मुरुम उचलून रस्त्याचे सुरु केले असल्याची तक्रार वडगाव तनपूरा (ता. कर्जत) येथील ग्रामपंचायत सदस्य नवनाथ तनपूरे यांनी कर्जतचे प्रांताधिकारी व तहसिलदार तसेच जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

वडगाव तनपुरा (ता. कर्जत) येथे कुकडी कॅनॉल डावा कालवा येथे एका ठेकेदाराने विनापरवाना माती, दगड, मुरुम (गौण खनिज) उचलून वडगाव ते तनपुरेमळ रोडचे काम सुरु केले आहे. कॅनॉलच्या ठिकाणी उत्खनन करुन या रस्त्याचे काम ठेकेदार करीत आहे. यामुळे कॅनॉलच्या साईडपट्टीस धोका निर्माण झाला असून, रस्त्याचे काम देखील निकृष्ट होत असल्याचा आरोप तनपूरे यांनी केला आहे.

याप्रकरणी कुकडीच्या कोळवडी येथील कार्यालयात तक्रार केली असता याची दखल घेण्यात आलेली नाही. रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून, संबंधित ठेकेदार वर भ्रष्टाचार अधिनियम 1998 चे कलम 17 अ प्रमाणे दखलपात्र गुन्हा नोंदवावा, या कामाचे बिले देखील त्याला देऊ नये, सदर कामाची गुणनियंत्रण मार्फत चौकशी करण्यात यावी, कुकडी कॅनॉलच्या साईडपट्टीलगत सुरु असलेले उत्खनन त्वरीत थांबविण्यात यावे, या संपुर्ण प्रकरणाची प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ तनपूरे यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –