…तसे जिल्हा परिषदेतही करू शकतो, अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत खा. सुजय विखे यांचे सूचक विधान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष व्हावा, असे प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभेमध्ये आम्ही बहुमत सिद्ध करू शकतो, तसे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा करू शकतो, असे सूचक विधान भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले.

विखे म्हणाले की, राजकारणामध्ये व प्रत्यक्ष कागदावर असलेले संख्याबळ यामध्ये केव्हाही काही घडू शकते. भाजपचा अध्यक्ष व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्यासमोर अडचणी आहेत, हे निश्चित आहे. आम्ही ज्या पक्षात आहोत, त्याचा अध्यक्ष व्हावा, अशी आमची भूमिका आहे.

नगर जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी 31 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्या दिवशी अनेक गोष्टींचा उलगडा होईल. भाजपची अध्यक्ष व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 31 डिसेंबर रोजी त्याबाबत अधिक बोलेल, असे ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/