नगर : शाळकरी मुलांसमोर ‘नटरंगी’ डान्स, क्रीडा अधिकारी कार्यालयाचा प्रताप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – 65 व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये स्पर्धक मुलांच्या मनोरंजनासाठी भक्ती संगीत आणि काही सामाजिक संदेश देणाऱ्या गाण्यांच्या नावाखाली मुलांसमोर लावणीवर डान्स दाखविण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेत हा प्रकार घडला.

3 जानेवारीपासून नगरच्या वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये 19 वर्षाखालील राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली होती. रविवारी संध्याकाळी अंध मुलांचा आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता. यामध्ये भक्ती संगीत आणि काही सामाजिक संदेश देणारे गाणे होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र अचानकपणे एका महिलेने या कार्यक्रमात लावणीवर डान्स केला. त्यामुळे काही वरिष्ठ खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.

लहान मुलांच्या मनावर या प्रकाराने काय परिणाम होतील याची तमा न बाळगता हे नृत्य कसे करू दिले, असे अनेक खेळाडूंनी विचारले. मात्र याला क्रीडा अधिकाऱ्यांनी काहीही स्पष्टीकरण दिले नाही. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे, असे काही खेळाडूंनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/