धक्कादायक ! नागपुरमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना ‘कोरोना’चा संसर्ग, एकाचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन टीम   –   देशात कोरोना ने हाहाकार माजवला आहे. राज्यात देखील कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आता नागपूरमध्येही २४ तासात ६ कोरोना संसर्गित रुग्ण आढळले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाला आहे. दरम्यान, सापडलेले सर्व रुग्ण हे या आधी कोरोना संसर्गित असलेल्या ६८ वर्षीय मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबातील आहे. तपासणी केली असता या सर्व ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

या ६८ वर्षीय व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं ४ एप्रिल रोजी मेयो या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होत. पण ५ तारखेला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा तपासणी अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला. दरम्यान, प्रशासनाने त्यांचा कुटुंबीयांची देखील चाचणी केली असता ६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं नागपुरात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या २५ वर गेली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

राज्यात कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत चालला असून गेल्या चोवीस तासात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील १४, मुंबईतील ९ तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या ९७ वर पोचली आहे. आज कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

तर ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात रुग्णांची संख्या १३८० झाली आहे. तसेच १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. विविध ठिकाणी ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजपर्यंत ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८ हजार ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३१ जण संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या २५ मृत्यूपैकी १२ जण हे ६० वर्षांवरील आहेत तर मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय १०१ वर्षे आहे. ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या २१ रुग्णांमध्ये (८४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व महापालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गित रुग्ण संख्या

मुंबई- ८७६

पुणे महानगरपालिका- १८१

पिंपरी चिंचवड मनपा- १९

पुणे ग्रामीण- ६

ठाणे मनपा – २६

कल्याण डोंबिवली मनपा- ३२

नवी मुंबई मनपा- ३१

मीरा भाईंदर- ४

वसई विरार मनपा- ११

पनवेल मनपा- ६

पालघर ग्रामीण एकूण- ३

सातारा- ६

सांगली – २६

नागपूर मनपा- २५

अहमदनगर मनपा- १६

बुलढाणा- ११

अहमदनगर ग्रामीण- ९

औरंगाबाद मनपा- १६

लातूर मनपा- ८

अकोला- ९

मालेगाव- ५

रत्नागिरी, यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती मनपा प्रत्येकी- ४

कोल्हापूर मनपा – ५

उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, जळगाव मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशिम, गोंदिया, बीड, सिंधुदुर्ग प्रत्येकी- १