Nana Patole | नाना पटोलेंचे फडणवीसांना आव्हान, सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती ते सांगा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस नेते (Congress Leader) खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या सावरकरांसबंधी वक्तव्यावर आकांडतांडव करण्याची काही गरज नाही. राहुल गांधी खरे तेच बोलले त्यात चुकीचे काय आहे? सावरकर व आरएसएसचे (RSS) स्वातंत्र्य चळवळीत काडीचेही योगदान नाही. सावरकर यांना ब्रिटिशांकडून पेन्शन (Pension) मिळत होती याचे अनेक दाखलेही आहेत. ही पेन्शन सावरकरांना कशासाठी मिळत होती हे फडणवीसांनी स्पष्ट करावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहे. आता यावर फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) एक महिना पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटकातील तुरुवेकरे येथे 34 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल यांनी सावरकर, आरएसएस आणि पीएफआयमधील (PFI) काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केले. देशातील जनता भ्रष्टाचाराने त्रस्त असून सरकार मीडियावर नियंत्रण ठेवत आहे, असे ते म्हणाले.

 

भारताच्या फाळणीबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, सावरकर स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांसाठी काम करायचे आणि त्यासाठी त्यांना पैसे मिळत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, आरएसएसनेही ब्रिटीश राजवटीला पाठिंबा दिला होता आणि आज त्यांच्या द्वेषाच्या विरोधात भारत जोडो यात्रा काढली जात आहे. यावर फडणवीस यांनी टीका करताना म्हटले आहे की, ही भारत जोडो यात्रा आहे की भारत तोडो. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांना वरील आव्हान दिले.

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्व देश काँग्रेसच्या झेंड्याखाली जात, धर्म, प्रांत विसरून एक झाला होता. या लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांचे काहीही योगदान नाही. उलट भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सावरकर व आरएसएसची भूमिका ब्रिटिशांना साथ देणारीच होती. ‘अंग्रेजो चले जाव, भारत छोडो’ चळवळीत सर्व देश एकवटला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठे होता? ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सशस्त्र लढा देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली असताना सावरकर यांनी मात्र ब्रिटिश सैन्यात तरुणांनी भरती व्हावे असे आवाहन करत होते. काळ्या पाण्याची शिक्षा एकट्या सावरकर यांनाच झाली नव्हती तर त्यांच्याबरोबर 149 स्वातंत्र्य सैनिकांनाही झाली होती पण या शिक्षेतून सावरकर यांनाच ब्रिटिशांनी नंतर मुक्त केले, हा इतिहास आहे.

 

पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुद्धा 11 वर्षे तुरुंगवास भोगला, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासह लाखो स्वातंत्र्य सैनिकांनीही तुरुंगवास भोगला,
लाठ्या काठ्या झेलल्या, हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले.
भारताच्या फाळणीचे बीज सावरकरांनी मांडलेल्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतातच आहे
हे ‘नव इतिहासकार’ फडणवीसांना माहित असेलच.

 

पटोले पुढे म्हणाले, खोटी व अपुरी माहिती देऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे,
जनतेचा बुद्धीभेद करणे ही आरएसएस व भाजपची कार्यपद्धती आहे.
अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये असताना सावकर बुलबुल पक्षावर बसून भारतभ्रमण करत होते
असा बनावही कर्नाटकातील भाजपच्या शासनाने शालेय पुस्तकात केला.
यातून खोटी माहिती पसरवण्याचे कामच भाजपाकडून (BJP) केले जात आहे हे स्पष्ट होते.

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला केरळ,
तामिळनाडू, कर्नाटकात जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भाजपाने धास्ती घेतली आहे.
त्यामुळे काहीतरी शोधून भारत जोडो यात्रा व राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याचे काम भाजपा करत आहे.

 

पटोले म्हणाले, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली यात्रा भारत जोडणारीच आहे,
तोडण्याचे काम भाजपा व आरएसएसचे आहे. म्हणूनच फडणवीसांच्या तोंडी ‘भारत जोडो की तोडो’ असे शब्द येणे आपसुकच आहे.
फडणवीस यांना राहुलजी गांधी यांच्या वक्तव्याने मिरच्या झोंबण्याचे काही कारण नाही कारण राहुलजी सत्य तेच बोलले.

 

Web Title :- Nana Patole | devendra fadnavis should explain why savarkar was getting pension from the british nana patoles challenge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MS Dhoni | “तुझ्या आयुष्यातील सर्वात अमूल्य गिफ्ट कोणतं?”, धोनीच्या उत्तराने ॲंकरची झाली बोलती बंद

National Games 2022 | महाराष्ट्राच्या राधिका आवटीला तलवारबाजीत मिळाले सुवर्णपदक

T20 World Cup 2022 | जसप्रीत बुमराहची जागा घेणार मोहम्मद शमी, 2-3 दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना