Nana Patole | ‘पंतप्रधानांनी गटारीचे उद्घाटन करावे म्हणजे…’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर नाना पटोले यांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर (PM Narendra Modi In Mumbai) असून यादरम्यान त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपुजन करण्यात येणार आहे. त्यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य करताना नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्ताधारी भाजपला चांगलाच टोला लगावला. एखाद्या गटाराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करावं, हे पंतप्रधान यांच्या प्रतिमेला ठेस पोहचविणारे आहे. असे मुंबई येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

 

आज (दि.१९) महाविकास आघाडीने संयुक्त आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘पंतप्रधान (PM Narendra Modi) उद्घाटन करत असेल्या कामांमध्ये काही गटारांची कामंही आहेत. देशाच्या पंतप्रधांनी गटारांचं उद्घाटन करणं म्हणजे पंतप्रधान पदाला एकप्रकारे धक्का लावण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. नरेंद्र मोदी हे गेली आठ-नऊ वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांनी भाजपाचा (BJP) प्रचार केल्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. मुळात पंतप्रधानांनी महापालिकेच्या प्रचाराला यावं की ग्रामपंचायतीला यावं, हा त्यांचा वयक्तीक विषय आहे. त्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही. पण गटाराचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करावं, हे मात्र पंतप्रधानपदाच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारं आहे.’ असा टोला यावेळी बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला लगावला.

तसेच यावर पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याचं भूमीपूजन केलं होतं, त्याचं काय झालं? राज्यपाल असेल किंवा भाजपाचे नेते सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. आज मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी वाढली आहे.
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो आहे.
गुजरात निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेले, या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला द्यावीचं लागतील.’
असेही यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.

 

 

 

Web Title :- Nana Patole | nana patole reaction on pm narendra modi mumbai visit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा