Nana Patole | पटोलेंविरोधात पुण्यात भाजपकडून फ्लेक्सबाजी ! ”नाना पुण्यात कधी येताय…, ते सांगा”

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान मोदीबाबत (PM Narendra Modi) वादग्रस्त विधान केल्याने भाजपने (BJP) आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असं खळबळजनक विधान नाना पटोले यांनी केलं होतं. यानंतर भाजपने आज राज्यभर आंदोलन करीत पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केलीय. त्यानंतर पुण्यात (Pune News) साने गुरुजी रस्त्यावर पटोले यांच्या विरोधात ‘नाना पटोले बरळले’ अशी फ्लेक्सबाजी पाहायला मिळाली आहे.

 

नाना पटोले यांच्या विधानानंतर भाजप (BJP) आक्रमक झाला आहे. आजच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी देखील नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
”काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि येरवडा रुग्णालयात दाखल व्हा,” अशी टीका महापौर मोहोळ यांनी केली.
यानंतर आता पुण्यात फ्लेक्सबाजी पाहायला मिळाली. ”नाना आपण पुण्यात कधी येताय ते सांगा आम्ही आपल्या स्वागताला उत्सुक आहोत,
आम्ही स्वागत कसे करतो ते आपल्या सहकारी पक्षातील मित्र असणाऱ्या जितुद्दीनला विचारा” असं त्या फ्लेक्समध्ये नमुद केलं आहे.
हा फ्लेक्स भाजपचे धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी लावला आहे.

दरम्यान, ”जेवनाळा येथील सभेत काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते.
त्यांना तुम्ही घाबरु नका. मी तुमच्या सोबत आहे. मोदीला मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले.
मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही.
माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे,” असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Nana Patole | when does nana patole come to pune tell me flexbaji from bjp against patole in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Online Portal for Pension Complaint | पेन्शनर्ससाठी सरकारने बनवले पोर्टल ! आता पेन्शनसंबंधी तक्रारी तात्काळ होतील दूर, जाणून घ्या पद्धत

 

Pune Crime | तडीपार गुंडांनी चायनीज स्टॉल चालकाला धमकावून उकळली खंडणी; पुण्याच्या विमाननगर परिसरातील घटना

 

Pune Crime | गुंडांच्या टोळक्यांनी वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटना; कळस आणि कोंढव्यात वाहनांची केली तोडफोड