Narayan Rane | ‘2019 ला फडणवीसांना सांगितलं होतं की युती करु नका, पण…’, नारायण राणेंचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | राज्यात सध्या भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत (Shivsena) चांगलाच वाद चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फडतूस म्हणाल्यापासून वाद जास्त वाढला आहे. त्या वक्तव्यावरुन फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजपने उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्यातच आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर प्रहार केला आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

पाच वर्षे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षनेते होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. भाजपनं 2014 साली जर उद्धव ठाकरेंना आधार दिला नसता, युती (Alliance) झाली नसती तर त्यांचे आमदार काही निवडून आले नसते. ते सत्तेत आले नसते. 2019 लाही मी देवेंद्र फडणवीस यांना सांगत होतो की युती करु नका. सगळं संपलंय त्यांचं, काही कामाचं नाही, असं नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले.

मी तिला बोलवून दम दिला असता

ठाण्यात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
रोशन शिंदेंना उद्धव ठाकरे सपत्नीक भेटायला गेल्यावरुन नारायण राणे यांनी टीका केली. रोशनी शिंदे मोदींवर, देवेंद्र फडणवीसांवर बोलतात. औकात आहे का? मी त्यांना बोलावून समजावलं असतं. बाई तू हे बोलू नकोस. तिला दम दिला असता. पण हे उलट तिची बाजू घेऊन ठाण्याला गेले. कुठल्या सैनिकासाठी कधी गेले नाहीत. सपत्नीक नाही किंवा कुटुंबही घेऊन नाही गेले, असे राणे म्हणाले.

ते कुटुंब का घेऊन जातात मला माहिती आहे. एकटे जाऊ शकत नाहीत. चालू शकत नाहीत. परिस्थिती गंभीर आहे.
त्यामुळे ताबा सुटला आहे. सत्ता गेली, मुख्यमंत्रीपद गेलंय. आयुष्यात शिवसेना,
उद्धव ठाकरेंना ते पद कधीच मिळणार नाही. आता फक्त राष्ट्रवादी (NCP) मदत म्हणून सोबत ठेवत आहेत.
स्पेशल खुर्ची वगैरे सागंतात. मात्र त्या खुर्चीशिवाय हे बसू शकत नाहीत. मागून टेकू लावावा लागतो.
स्टेंट टाकल्यामुळे ते बसू शकत नाहीत. त्यामुळे जिथे मीटिंग तिथे ती खुर्ची घेऊन जावी लागते.
लोकांना वाटतं सिंहासन चाललंय, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली.

Web Title :- Narayan Rane | bjp narayan rane slams uddhav thackeray on calling devendra fadnavis fadtus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘फडणवीसांना गृहमंत्री पदावरून हटवा किंवा त्यांचा राजीनामा घ्या’, ठाकरे गटाच्या खासदाराने घेतली अमित शहांची भेट

NCP MLA Rohit Pawar | ‘छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा नेता फडणवीसांसोबत पहिल्या रांगेत’, रोहित पवारांचा संताप, म्हणाले- ‘महाराष्ट्राच्या जखमेवर…’

Maharashtra Cabinet Expansion | सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच, राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोठी माहिती आली समोर