नारायण राणेंचा नाना पटोलेंना थेट इशारा, म्हणाले – ‘परत PM मोदीवर टीका केली तर आम्ही वाजवून टाकू’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे Congress  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तोडफोड अन् काड्या करायची सवय आहे. ते पक्ष जोडणारे नाहीत तर तोडणारे आहेत. तसेच त्यांनी परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली तर वाजवून टाकू अशा थेट इशारा भाजप नेते खासदार नारायण राणेंनी (Narayan Rane) दिला आहे. तसेच राणेंनी (Narayan Rane) राष्ट्रपती नियुक्त भाजप खासदार संभाजी राजेंवरवर देखील घणाघाती टीका केली आहे.
आजूबाजूला रयत नसताना कसले राजे, असा टोला लगावला आहे.

संभाजीराजेंचा मराठा आरक्षणाचा मुद्द्यांवर बोलताना आणि आंदोलनाबाबत विचारल्यावर ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्याचे माहीत नसल्याचे राणें यांनी सांगितले.

संभाजीराजे म्हणून कोणी पुढारी बनत नाही.
समाजाला वाटले पाहिजे की हे राजे आहेत आमचे.
ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये.

तुमचे आरोग्य उत्तम ठेवतो ‘आर्टिस्टिक योगा’

रायगडावर कोण आहेत आंदोलन करायला असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केला आहे. आंदोलन हे लोकांमध्ये जाऊन करावे.
पेटवायला पण एक धमक लागते.
खासदारकी संपता संपता हे सगळे कसे आठवायला लागले.

राजे असतील तर रयत दिसली पाहिजे ना आजूबाजूला. ती कुठे दिसत नाही.

जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन कोणी नेता होत नाही, अशा शब्दात राणेंनी संभाजीराजेंना टोला लगावला आहे.

 

Also Read This : 

 

Maharashtra Unlock : ‘राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत, अजून अनलॉक केलेला नाही’ विजय वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

 

झोप येत नसेल तर खा ‘हे’ खास प्रकारचे चॉकलेट, इम्युनिटी बूस्टर सुद्धा, वाढवते एनर्जी

 

छत्रपती संभाजीराजेंचे आवाहन, म्हणाले – ‘राज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करा, माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा’

 

Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या

 

HSC Exam : ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्यातील इयत्ता 12 वीच्या परीक्षा अखेर रद्द

 

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

 

Pune : दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक ! धनकवडीतील आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक, 5 दिवस पोलीस कोठडी

 

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या