नारायण राणे स्वबळावर की महाआघाडीत ? 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत . त्यामुळे सर्व पक्षातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकांच्या तोंडावर काहीसे एकाकी पडलेल्या नारायण राणेंना काँग्रेस – राष्ट्रवादीने महाआघाडीत घेण्याच्या हालचाली सुरु केल्याचे सूत्रांकडून समजते आहे . यापूर्वी नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे. असे सांगण्यात येत होते. मात्र आता महाआघाडीत घेण्यासाठीच्या हालचालींना वेग आल्याचे समजते आहे.

नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाला लोकसभेची रत्नागिरी-सिंधुदूर्गाची जागा देण्याची काँग्रेसची तयारी असल्याची माहिती राजकीय सुत्रांनी दिली आहे. एवढंच नव्हे तर या संदर्भात महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींशी चर्चा देखील केल्याचं सुत्रांनी सांगितलंय. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळं काँग्रेसचा हात सोडणारे नारायण राणे लोकसभेच्या एका जागेसाठी महाआघाडीला साथ देणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...
You might also like