अखेर नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपमध्ये विलीन !

कणकवली : पोलिसनामा ऑनलाईन –  राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांनी जोर धरला असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीमध्ये भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे देखील भाजपमध्ये विलीनीकरण करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांचे मोठे पुत्र निलेश राणे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले कि, कोकणच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असून यापुढे कोकणातील रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.

नारायण राणे यांच्या सर्व कुटुंबाने देखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील वर्षी नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा देत स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. मात्र काही दिवसांपासून ते पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याची माहिती मिळत होती. मात्र आज अखेर त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करत या चर्चांना विराम दिला.

दरम्यान, नितेश राणे भाजपचे अधिकृत उमेदवार असले तरी या ठिकाणी शिवसेनेने उमेदवार उभा करत बंडखोरी केली आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री शिवसेनेच्या या भूमिकेवर काय बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी