Nari Shakti Vandan Walkathon In Pune | “नारी शक्ती वंदन वॉकेथॉन” ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nari Shakti Vandan Walkathon In Pune | आज सकाळी पुण्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन हिंदू नवीन वर्षाची सुरुवात “नारी शक्ती वंदन वॅाकेथॅान” च्या माध्यमातून केले असल्याचे वॅाकेथॅानच्या संयोजिका हर्षदा फरांदे (Harshada Pharande) यांनी सांगितले. असंख्य पुणेकर महिलांनी एकत्र येऊन नारी शक्ती ला वंदन करत आपल्या देशासाठी, महिला शक्तीसाठी सक्षम होण्याचा संकल्प केला.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जगात सगळीकडे महिलांची ताकत आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे असे प्रतिपादन केले. “मोदींनी महिला स्टार्टअपवर भर दिला आहे. महिला स्टार्टअप मध्ये आपण जगात एक नंबर आहोत. मुलींना उत्तम शिक्षण द्या. आपल्या सरकारने मुलींना शिक्षण मोफत केलं आहे. सर्व महिला सक्षम आणि कर्तुत्ववान झाल्या पाहिजेत. आता विधानसभा आणि लोकसभेत 33 टक्के आरक्षण मोदी सरकारने (Modi Govt) दिले आहे. मला इथं अनके महिला आमदार आणि खासदार झालेल्या दिसत आहेत. आपल्या नावात आईचे देखील नाव लावणे हाच मातृशक्तीचा सन्मान आहे. राज्य सरकारने तसा सन्मान द्यायला सुरुवात केली आहे. माझ्या घराच्या पाटीवर देखील माझ्या आईचे नाव लिहिले आहे. ह्या नारीशक्तीला मी वंदन करतो आणि शुभेच्छा देतो” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना महायुतीचे (Mahayuti) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून सर्व भारतीयांच्या अबकी बार चारसो पार ह्या संकल्पाची खात्री वाटते असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरीताई मिसळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, माजी आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते.

सणस ग्राऊंड, सारस बागे जवळ येथून ह्या वॅाकेथॅानला प्रारंभ झाला. या उपक्रमात २००० पेक्षा जास्त महिलांनी
सहभाग घेतला होता. एका दिवसात ७५ वेळा पर्वती चढून जाणारे श्री. वसंत गोखले आणि त्यांचे सहकारी,
अनंत आगरखेडकर, नंदकुमार तांबे यांनी मार्गदर्शन केले .
एकूण २.५ किमी ची ही वॉकेथॉन आयोजित करण्यात आली होती.

सदर वॉकेथॉनचे आयोजन हर्षदा फरांदे, गौरी जाधव, पूजा रावेतकर, वनिता वागस्कर,
सुदर्शना त्रिगुणाईत, सुनीता वाडेकर, प्रियांका शेंडगे, अर्चिता जोशी यांनी केले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”समोर असता तर कानाखाली…”, रोहित पवार संतापले, अजित पवारांच्या समोरच वक्त्याने काढला शरद पवारांच्या व्याधीचा विषय

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या गटात नाराजी? गडचिरोली, परभणीपाठोपाठ नाशिक गेले, सातारा गेले हाती आल्या 4 जागा

Police Personnel Died In Accident | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांचा मृत्यू

Amol Kolhe | मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही – डॉ. अमोल कोल्हे

Pune Crime Court | पुणे : पतीच्या खुनाच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत