Video : 10 वर्षात किती बदलला तळपता सूर्य, NASA नं शेअर केला व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवकाशात सूर्याचा आकार,त्याच्या मुखपृष्ठावर होणाऱ्या घडामोडी या खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्याच्या घडामोडीद्वारे सौर यंत्रणेत कधी, काय कश्याप्रकारे घडेल, या सर्वांचा अभ्यास करून अंदाज बांधला जातो. आमेरिकेतील स्पेस एजन्सी नासाने यासंबंधित एक व्हिडिओ आपल्या अधिकृत यूट्यूबवर शेअर केला आहे. ज्यात सूर्यातील बदलांचा व्हिडीओ काढण्यासाठी काही वैज्ञानिकांनी विशेष उपकरणांचा वापर केला आहे. या उपकरणांचा वापर करून सूर्यावर होणाऱ्या विविध हालचाली टिपल्या आहेत.

याद्वारे, नासाने गेल्या 10 वर्षातील अनेक हालचाली कॅप्चर केल्या आहेत. 2 जून 2010 ते 1 जून 2020 या कालावधीत सूर्यावरील वेगवेगळ्या हालचाली टिपल्या आहेत. नासा सूर्यावरील हालचालींच्या बारीक निरीक्षण करत आहे. शास्त्रज्ञ वारंवार सूर्यावरील रहस्यमयी हालचाली आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतात. 10 वर्षांत सूर्यात होणारे बदल पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.