ब्रेकिंग : शिवसेनेच्या 36 नगरसेवकांसह 350 कार्यकर्त्यांचे राजीनामे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक पश्चिमची जागा भाजपाला गेल्याने नाराज असलेल्या तब्बल 36 नगरसेवकांसह 350 कार्यकर्त्यांनी शिवसेनाचा राजीनमा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पश्चिमची जागा भाजपाला गेल्याने तेथून सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेचे गटनेते विलास शिंदेंनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली. शिवसैनिकांनी शिंदेना पाठिंबा दर्शविला आहे.

काही दिवसांपुर्वीच शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. कल्याण आणि परिसरातील सेनेच्या तब्बल 26 नगरसेवकांनी राजीनामा दिला होता. त्या घटनेला काही दिवस पुर्ण झाले नाही आणि मतदानाची तारीख जवळ असतानाच शिवसेनेच्या 36 नगरसेवकांनी आणि तब्बल 350 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीधर्म कसा पाळला हे सांगितले तसेच शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना याबाबतची कल्पना देण्यात येईल आणि त्यावर मार्ग काढण्यात येईल असे सांगितले आहे. घडलेला प्रकार हा दुर्देवी असल्याचे देखील खा. राऊत यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक जिल्हयामध्ये भाजपकडून शिवसेनेला काऊंटर करण्यात येत आहे. दरम्यान, खा. राऊत यांनी राजीनामे दिलेल्यांवर काय कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आलेले नाही.

शिवसेनेने युती धर्म पाळावा : सीमा हिरे –
नाशिक पश्चिमची जागा शिवसेनेला सुटावी यासाठी शिवसेना आग्रही होती. मात्र, जागावाटपामध्ये ही जागा भाजपच्या वाटल्याला आली. लोकसभेच्या वेळी भाजपने शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यासाठी युतीधर्म पाळला. आता शिवसैनिकांनी युती धर्म पाळावा असे सीमा हिरे यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी