Nashik Graduate Constituency | अखेर नाशिक पदवीधर मतदासंघात भाजपचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Graduate Constituency | काँग्रेससोबत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना भाजपची साथ मिळणार का? याबाबतचा प्रश्न गेली अनेक दिवस राजकीय वर्तुळात विचारला जात होता. अखेर त्याला आता पूर्णविराम लागला आहे. भाजपने अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती भाजपचे नेते आणि राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

 

यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, ‘आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.’ (Nashik Graduate Constituency)

हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला गेल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
तर अगदी काही दिवसांपूर्वी बोलताना भाजपचे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले होते
की, ‘पाठिंब्याबाबत पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही मात्र आम्ही आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही.
हे स्पष्ट आहे. आम्ही भूमिपुत्र म्हणजेच जिल्ह्यातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणार आहे.
दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवाराला पाठिंबा का द्यावा? अशी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याने त्यांच्या
भावना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सांगणार आहोत.
पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे जिल्ह्याला जर चांगली संधी मिळत असेल तर त्याचं सोनं केलं जाईल.’

 

त्यानंतर स्वतः मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर केल्याने आता
महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) आणि सत्यजीत तांबे यांच्यात थेट लढत होणार आहे.

 

Web Title :- Nashik Graduate Constituency | bjp announces support to satyajeet tambe for nashik graduate constituency election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahesh Landge | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून आमदार महेश लांडगेंची सर्वपक्षीयांना भावनिक साद; म्हणाले…

Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…

Amar Mulchandani ED Raid | कट रचून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर मूलचंदानी याच्यासह 6 जणांविरुद्ध ईडीकडून स्वतंत्र FIR