नाशिकमध्ये खांदेपालटाची परंपरा मोडीत ; शिवसेनेचे हेमंत गोडसे पुन्हा विजयी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या ४२ वर्षांपासून एका खासदाराला दुसऱ्यांदा संधी न देण्याची पंरपरा असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे पुन्हा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे समीर भुजबळ विरूद्ध शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यात लढत होती. या लढतीत हेमंत गोडसे तब्बल २,३१९६२ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांना २,३१,९६२ मते पडली. तर शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना ४,५७,४०३ मते मिळाली. गेल्या निवडणुकीत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. नाशिक लोकसभा मतदार संघात एकूण मतदार १८ लाख ८२ हजार १११ मतदार आहेत. यंदा ५९.४३ % मतदान झाले असून ११ लाख ८५ हजार ५२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तुरुंगातून सुटल्यानंतर भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. निवडणुकीच्या अगोदर बहुजन वंचित आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, अशी घोषणा केली होती. परंतु समीर भुजबळ यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी पवन पवार यांना उमेदवारी देऊन आघाडीसमोर आव्हान उभे केले होते, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे ते अपक्ष लढले होते. महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लॉडरिंग कायद्यांतर्गत दोन वर्षे तुरुंगवास भोगलेल्या समीर भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेने विद्यमान खासदार गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. २००९ च्या निवडणुकीत समीर भुजबळ यांनी हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. त्यावेळी त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती. २०१४ च्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. २०१४ मध्ये गोडसे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव केला होता.

नाशिक मतदार संघ
एकूण मतदार – १८ , ८२ , १११

एकूण मतदान – ५९.४३ %

विजयी उमेदवार – हेमंत गोडसे (शिवसेना)

मिळालेली मते – ४,५७,४०३