‘फुकट’ योजना कशा राबवायच्या हे भुजबळांकडून शिका : संजय राऊत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील महाराष्ट्र सदनचे उदाहरण देत छगन भुजबळ यांनी शासकीय पैसा खर्च न करता सर्वात चांगली इमारत उभी करण्याचे काम केले असल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भुजबळांवर स्तुती सुमने उधळली आहेत. तसेच फुकट योजना कशा राबवायच्या हे भुजबळांकडून शिका असे देखील राऊत या वेळी म्हणाले.

भाजपकडून छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन प्रकरणी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता संजय राऊत यांनी भुजबळांच्या कामाचे कौतुक केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नाशिकमधील जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष काम करेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. राऊत हे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे वारंवार सांगत होते राऊत यांनी हिंमत दिली त्यामुळे त्यांचे कौतुक करायला हवे असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

शिवभोजन ही राज्य सरकारची पायलट योजना असल्याचे यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात रिमोट कंट्रोल शोभत होता असं म्हणत शरद पवार यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याचेही राऊत यांनी सांगितले. तसेच खातेवाटप पूर्ण झाले असल्याची माहिती देखील यावेळी राऊत यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/