धक्कादायक ! आईचा खून करून तीन दिवस राहिला मृतदेहासोबत

येवला (नाशिक) : पोलीसनामा ऑनलाइन – आईने पैसे दिले नाहीत म्हणून आईला बेदम मारहाण करून खून केला. खून केल्यानंतर आईच्या मृतदेहासोबत तीन दिवस राहिला. मात्र, घरातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा धक्कादायक प्रकार येवला येथील बुंदेलपुरा परिसरात घडला. याप्रकरणी मुलाला अटक करण्यात आली आहे.

लीलाबाई कांतीलाल गुजर (वय-७०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राजू उर्फ राजेंद्र गुजर (वय-२८) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपी राजेंद्र गुजर याने तीन दिवसांपूर्वी आईचा खून करून तिचा मृतदेह घरात लपवून ठेवला. गुजर यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुजर यांच्या घरात जाऊन पाहिले असता लीलाबाई गुजर यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी राजेंद्रला अटक केली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र याला दारुचे व्यसन होते. दारुसाठी तो आईकडे वारांवार पैशांची मागणी करत होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. तीन दिवसांपूर्वी राजेंद्रने आईला दारुसाठी पैसे मागितले होते. त्यावेळी तिने पैसे देण्यास नकार दिला होता. यातूनच त्यांच्यात वाद झाले. याच वादातून त्याने आईचा खून केला असावा असे सांगण्यात येत आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय

पुरुषांनी ‘हा’ उपाय केल्यास शरीर राहील निरोगी

‘साथी’ देणार रुग्णांना हक्काची साथ

वीस वयानंतर मुलींच्या शरीरात होतात ‘हे’ बदल