Coronavirus : 24 तासात ‘कोरोना’चे 773 नवीन रूग्ण तर 10 जणांचा मृत्यू, देशातील संख्या 5194 वर : आरोग्य मंत्रालय

ननवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनच्या स्थितीबद्दल आरोग्य आणि गृह मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी कोरोना व्हायरसच्या रूग्णांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, आतापर्यंत 402 रूग्णांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज दिला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत 5194 रूग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाचे 773 रूग्ण समोर आले असून आतपर्यंत 149 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. काल सुमारे 10 लोकांचा बळी कोरोनामुळं गेला आहे.

देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत केंद्र कोरोनाला रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जात आहे. लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असून त्यापुढेही चालु राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी शनिवारी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातील सुमारे 15 जिल्हयातील हॉटस्पॉट सील करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईत मास्क वापरणं आता बंधनकारक करण्यात आलं नाही. मास्क न वापरणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या 24 तासामध्ये 10 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला असून तब्बल 773 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळं 149 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 5194 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत 402 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.