राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून मिळालेल्या देणगीबाबत भाजप अध्यक्ष नड्डा यांनी सोनिया यांना विचारले 10 प्रश्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कॉंग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला. राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून किती पैसे मिळाले, असे थेट त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना विचारले. भाजप अध्यक्षांनी कॉंग्रेस नेत्यांना एकामागून एक असे एकूण १० प्रश्न विचारले. कॉंग्रेस आणि सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून का आणि किती पैसे दिले गेले? भाजप अध्यक्ष म्हणाले, ‘मला सोनियाजींना सांगायचे आहे की कोरोनामुळे किंवा चीनमधील परिस्थितीमुळे मूलभूत प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करु नये. भारतीय सैन्य देश आणि आपल्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे.’ सत्तेत असताना काँग्रेसने काय-काय केले आणि कसे देशाच्या आत्मविश्वासाचा विश्वासघात केला आहे, हे १३० कोटी देशवासीयांना जाणून घ्यायचे आहे, असे म्हणत भाजप अध्यक्षांनी पुढचा प्रश्न विचारला.

राजीव गांधी फाउंडेशनवर काही दिवसांपूर्वी ट्वीट करून प्रश्न विचारला होता, असे नड्डा म्हणाले. आज पी. चिदंबरम म्हणतात फाउंडेशन पैसे परत करेल. देशाचे माजी अर्थमंत्री जे स्वतः जामिनावर आहेत, त्यांच्याकडून हे कबूल करणे की अहितात फाऊंडेशनच्या नियमांची अवहेलना करत देणगी घेतली. आज देशाला जाणून घ्यायचे आहे की कॉंग्रेस आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा काय संबंध आहे? या दोघांमधील स्वाक्षरी आणि अस्वाक्षरी केलेला सामंजस्य करार काय आहे? भाजप अध्यक्ष म्हणाले की, आरसीईपीचा भाग बनण्याची काय गरज होती? चीनसह भारताची व्यापार तूट १.१ अब्ज अमेरिकन डॉलरने वाढून ३६.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स कशी झाली? ते म्हणाले की देशातील जनतेला याचे उत्तर जाणून घ्यायचे आहे की, पीएम राष्ट्रीय मदत निधी जो लोकांची सेवा आणि त्यांना दिलासा देण्यासाठी आहे, त्यातून २००५-०८ पर्यंत राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले गेले?

यूपीएच्या कारकिर्दीत राजीव गांधी फाउंडेशनला पैसे देण्यासाठी अनेक केंद्रीय मंत्रालये, सेल, गेल, एसबीआय आणि इतरांवर दबाव का आणला गेला हे जनतेला जाणून घ्यायचे आहे, असेही मोठ्या आरोपांसह नड्डा यांनी विचारले. तत्कालीन पीएम राष्ट्रीय मदत निधीचे ऑडिटर कोण होते? त्याला उत्तर देताना नड्डा म्हणाले की, ठाकूर वैद्यनाथन अँड अय्यर कंपनी ऑडिटर होते. रामेश्वर ठाकूर हे त्याचे संस्थापक होते. ते राज्यसभेचे खासदार होते आणि चार राज्यांचे राज्यपाल होते. ते अनेक दशक ऑडिटर होते… असे का? अशा लोकांना ऑडिटर बनवून सरकारला काय करायचे आहे हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे भाजप अध्यक्ष म्हणाले. तत्कालीन पीएम राष्ट्रीय मदत निधीमधील ट्रस्ट एक कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षही आहेत. मला हे जाणून घ्यायचे आहे की, एका कुटुंबाद्वारे नियंत्रित असलेल्या राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला देणगी कशी दिली गेली? माझा कॉंग्रेसला प्रश्न आहे की, मेहुल चौकसीकडून राजीव गांधी फाउंडेशनमध्ये पैसे का घेतले गेले? मेहुल चोकसीला कर्ज देण्यासाठी मदत का केली गेली?