Coronavirus In India : 21 मार्चनंतर परदेशातून आलेल्या 64 हजार लोकांवर स्पेशल ‘वॉच’, कम्युनिटी ‘ट्रान्समिशन’चा धोका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाच्या विरोधात लढा सुरु झाला आहे, 21 मार्चनंतर देशात आलेल्या 64 हजार लोकांना सध्या क्वारंटाइनमध्ये ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच सांगण्यात आले आहे की अशा लोकांवर नजर ठेवली जावी. जर कोणी निर्देशांचे उल्लंघन केले तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी.

कारण या लोकांमुळे कम्युनिटी ट्रांसमिशनचा धोका वाढू शकतो आणि त्यानंतर स्थिती आणखी बिघडू शकते. मानले जात आहे की यामुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानचे सचिव लव अग्रवाल म्हणाले आतापर्यंतच्या अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे की विदेशातून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचे संक्रमण पसरण्याचा मोठा धोका आहे. यामुळे सरकार त्यांच्याबाबत सतर्क आहे.

ते म्हणाले की देशात अशा लोकांची ओळख केली जात आहे जे विमानतळावरुन नजर चुकीवून बाहेर पडले. अशा लोकांना कोणाशी संपर्कात न येण्याचे आणि घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. यासह त्यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले सध्या देशात 118 सरकारी लॅब आहेत जेथे 12 हजार पेक्षा जास्त लोकांच्या चाचणीची व्यवस्था आहे, जी आणखी वाढवली जाऊ शकते.

यासह 29 खासगी लॅबला देखील आयसीएसआरअंतर्गत गाइडलाइन देण्यात आली आहे ज्याअंतर्गत चाचणी करण्यास अनुमती देण्यात आली आहे, ज्यांचे देशात 16 हजार पेक्षा जास्त कलेक्शन सेंटर आहेत. आरोग्य मंत्रालयाने मलेरियासाठी वापरल्या जाणाऱ्या डायड्रो क्लोरोक्वीन औषध डॉक्टरांच्या परवानगीशिवाय न घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की हे फक्त संक्रमित लोकांना किंवा आरोग्य सेवेत काम करत असलेल्या लोकांना देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की हा आजार रोखण्यासाठी समाजात महत्वाचा संदेश देणं गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना अशा लोकांची यादी तयार करण्यास सांगितले आहे ज्यांनी 14 दिवसात दुसऱ्या देशातून किंवा इतर राज्यातून प्रवास केला आहे. त्यांनी या लोकांची यादी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्यांकडे द्यावी. याशिवाय मंत्रालयाने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले आहे.