रविवारच्या आधीच PM मोदींनी सगळ्यांना केलं आश्चर्यचकित, म्हणाले – ‘माझे सगळे सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांकडे सुपूर्द करणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल म्हणजेच सोमवारी पंतप्रधान मोदींनी ट्विट करत सर्वांनाच धक्का दिला. आपण सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याचा विचार करत आहे असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार अंदाज होता की ते आता सोशल मीडिया सोडणार आहेत. पुढे ते असेही म्हणाले होते की यासंबंधित आधिक माहिती मी नंतर देईल. त्यांनी रविवारपर्यंत थांबण्यास सांगितले होते. परंतु त्यांनीच स्वत: मंगळवारी सर्वांना हैराण केले. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की ते सोशल मीडियापासून दूर राहणार नाहीत.

मंगळवारी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की या महिला दिनी ते आपले सोशल मीडिया अकाऊंट त्या महिलांना समर्पित करतील ज्यांच्यामुळे ते प्रेरित झाले आहेत. 16 तासानंतर पीएम मोदींनी या सस्पेंसवरुन पडदा हटवत घोषणा केली की महिला दिनाच्या या विशेष प्रसंगी सुरु झालेल्या मोहिमेत (कँपेंन) कोणीही सहभागी होऊ शकते.

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी ट्विट केले की या महिला दिनी मी माझे सोशल मीडिया अकाऊंट त्या महिलांना समर्पित करेल ज्यांच्या जीवनाने आणि कामाने मला प्रेरित केले. ते त्या लाखोंना प्रेरित करण्यासाठी प्रोस्ताहन देतील.

पंतप्रधान पुढे म्हणाले, तुम्ही ती महिला आहात किंवा तुम्ही अशा कोणत्या महिलेला ओळखतात ज्यांनी तुम्हाला प्रेरित केले आहे ? तुमची अशी कोणती कथा असेल तर ती सांगा. #SheInspiresUs असा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला.

सोमवारी पंतप्रधान मोदींच्या ट्विटने सस्पेंस –
सोमवारी रात्री 8.56 वाजता पंतप्रधान मोदींनी ट्विट केले होते, ज्यानंतर खळबळ उडाली होती. पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हणले होते की रविवारी ते आपले फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब सारखे सोशल मीडिया अकाऊंट सोडण्याचा विचार करत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या या ट्विटनंतर ते सोशल मीडिया सोडणार अशी चर्चा सुरु झाली होती. यानंतर ट्विटरवर काही मिनिटातच #NoSir ट्रेंड होण्यास सुरुवात झाली होती, ज्यात पंतप्रधान मोदींना त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडिया न सोडण्याचे आवाहन केले होते.