Coronavirus : ‘कोरोना’च्या संकट समयी मदतगार ‘मेंटल टूलकिट’, वाचा तज्ञांचं मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना केवळ शारीरिक आजारच नाहीये तर याच्या प्रसाराने जगभरात लोकांना आपल्या घरात लपून बसण्यास भाग पाडले आहे. यामुळे लोकांना वेगवगेळ्या प्रकारच्या चिंता सतावत आहेत. एका वृत्तसंस्थेनुसार, आपल्या मानसिक आरोग्यवर देखील परिणाम होत आहे. अशात ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. मॅक्स काही उपाय सांगत आहेत, ज्यामुळे लॉकडाऊन सारख्या कठीण काळात दिलासा आणि सकारात्मकतेची भावना निर्माण होईल. त्यांच्यानुसार, काही अशा सामान्य गोष्टी आहेत, ज्या केवळ संकट काळात मदत करतात. जाणून घेऊया अशा काही टिप्स…

चरित्र वाचा :
ज्या लोकांना संकटे आणि आव्हाने आली अशा लोकांचे चरित्र वाचा. कारण तुम्हाला तुमच्या अडचणी आणि संघर्षातून बाहेर येण्यास यापेक्षा जास्त चांगली शिकवण अजून कुठेही मिळणार नाही.

नित्यक्रम :
हे फार महत्वाचे आहे. आपण सवयी असलेले प्राणी आहोत आणि आपल्याला जीवनात व्यवस्था हवी आहे. दिवसाचे टाईम टेबल बनवा. आपले घर कितीही छोटे असले तरीही कामासाठी, व्यायामासाठी आणि विश्रांतीसह इतर कामांसाठी जागा निश्चित करा. खाण्यासाठी आणि झोपायची वेळ ठरवा. सध्या बरेच लोक घरून काम करत आहेत आणि यापैकी बर्‍याच लोकांनी वेळापत्रक बनवले आहे. तरीही ते सकाळी करतात. सकाळी लॅपटॉप आणि मोबाइल फोनवर काम करण्यास सुरुवात करतात – परंतु तसे करू नका.

एक ध्येय ठरवा :
तुम्ही नेहमीच कादंबरी वाचण्याचा किंवा इतर काही काम करण्याचा विचार केला असेल. आत्ता ते करायची संधी मिळाली आहे. तुम्ही असे केल्यास, स्वत:ला अतुलनीय वाटेल. ज्या लोकांना कामं नाहीयेत. टीव्ही पाहत स्नॅक्सचा आनंद घेतात – ते टाळा. या दिवसात अल्कोहोल घेत असाल तर आणखीच वाईट आहे. कारण ते तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते.

लॉकडाउनची प्राथमिकता आरोग्याचे रक्षण करणे आहे. आराम करण्यासाठी तुम्ही टीव्ही पाहता हे ठीक आहे, पण त्यासाठी तुम्ही व्यायाम देखील केला पाहिजे. ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. विशेषत: तेव्हा जेव्हा आपण घराबाहेर पडू शकत नाही. यासाठी तुम्ही कमीतकमी ३० मिनिटांसाठी एरोबिक्स किंवा योगा करू शकता, पायर्‍या झाडण्याचे काम देखील करू शकता. हे तुमची भूक आणि झोपेत मदत करेल आणि तुमची रोग प्रतिकारशक्ती देखील वाढवेल.

एखादे कौशल्य शिकून घ्या :
ऑनलाइन अनेक कोर्स उपलब्ध आहेत. तुमच्या बौद्धिकतेला किंवा आनंदाला सक्रिय करा. यामुळे तुम्हाला कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यास मदत होईल. याने हाही फायदा होईल जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा काही सकारात्मक गोष्टी मिळवल्या असतील. उदा, तुम्ही एखादी दुसरी भाषा बोलणे शिकू शकता किंवा जादूगारही बनू शकता.

अस्वस्थ वेळ :
दिवसात अशीही वेळ असते ज्यावेळी तुम्ही थोडे उदास, अस्वस्थ, एकटे किंवा रागात असता. हे साहजिक आहे. पण असे काही तरी करा ज्यामुळे या अस्वस्थेत तुम्हाला बरे वाटेल. मित्रांना फोन करा, डायरी लिहा, गाणी ऐका. हे केल्याने तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही.