भरलेलं LPG ‘गॅस सिलिंडर’ किती काळ घरात ठेवावं, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : बर्‍याच वेळा आपले ट्रान्सफर दुसर्‍या शहरात होते तेव्हा आपल्याला आपल्या जुन्या घरात एलपीजी सिलिंडर ठेवण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत हा प्रश्न नक्कीच मनात येईल की आपण भरलेल्या गॅस सिलेंडरला किती काळ घरी ठेवू शकता. भरलेला एलपीजी सिलिंडर काळजीपूर्वक ठेवल्यास आपण बर्‍याच वर्षापर्यंत त्यास घरात ठेवू शकता, यामुळे कोणताही धोका होणार नाही.

गॅस सिलिंडर किती जुने झाले आहे ते अवश्य पहा

तज्ञांच्या मते, एलपीजी गॅस सिलेंडर्स बर्‍याच वर्षांपर्यंत घरात ठेवता येऊ शकतात. ते सिलिंडर किती जुने आहे ते आपण पाहिलेच पाहिजे. मानकांनुसार, गॅस सिलिंडर 10 वर्षांनंतर रिसायकल केले जाते, कारण त्यामध्ये गंज लागण्याची शक्यता असते. त्याच्या निर्मितीची तारीख गॅस सिलिंडरवर नोंदविलेली असते. म्हणून जेव्हा आपण रिक्त घरात भरलेले सिलेंडर ठेवता तेव्हा हे सिलिंडर किती जुने झाले आहे ते पाहणे गरजेचे आहे.

सिलेंडर कसे ठेवावे

आपल्याला जर दीर्घकाळासाठी गॅस सिलिंडर ठेवायचे असेल तर त्याचे रेगुलेटर काढा आणि त्यावर कॅपचे सील लावा. एलपीजी सिलिंडर कोरड्या जागी ठेवायला हवे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तसेच ते आग आणि पाण्यापासून दूर ठेवले पाहिजे.

किती वर्षांपर्यंत ठेऊ शकता

जर सिलिंडरची स्थिती चांगली असेल तर त्यामध्ये 30 वर्षे गॅस आरामात ठेवता येतो, परंतु आपण इतके दिवस असे करू नये. सिलिंडरची भारतात 10 वर्षांची मुदत आहे, त्यानंतर त्याची तपासणी केली जाते. हे भरलेले गॅस सिलिंडर जास्त दिवस घरात ठेवणे टाळले पाहिजे.