PM मोदी बनले Facebook वरील जगातील सर्वात ‘लोकप्रिय’ नेते, जाणून घ्या जगातील इतर नेत्यांचे ‘स्थान’

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत नरेंद्र मोदी यांनी देशात सत्ता मिळवली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनविण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. त्यानंतर 2019 निवडणुकीत देखील नरेंद्र मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली. सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांना फॉलो करणाऱ्यांची सख्या मोठी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

फेसबुकवर 4.5 कोटी लाईक्ससह पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. पोस्ट रँकिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अव्वल स्थानावर आहेत. कोरोना साथी दरम्यान जगातील इतर नेत्यांचेही या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर आपले फॉलोअर्स वाढले आहेत.

ग्लोबल कम्युनिकेशन्स एजन्सी ‘बर्सन कोहान अँड वोल्फे’ यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या ‘वर्ल्ड लीडर्स ऑन फेसबुक’ क्रमवारीत ट्रम्प 2.7 कोटी लाईक्ससह ट्रम्प फेसबुकवरील दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत. तर जॉर्डनची क्वीन रानिया 1.68 लाईक्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत.

ट्रम्प यांनी पहिल्यानंबर असल्याच दावा केला होता
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प भारत भेटीला आले होते. भारत भेटीवर येण्यापूर्वी त्यांनी स्वत:ला फेसबुकवर पहिला क्रमांक असल्याचे सांगितले होते. त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, मला वाटते हा मोठा सन्मान आहे. मार्क जुगरबर्ग यांनी नुकतेच सांगितले की डोनाल्ड जे. ट्रम्प फेसबुकवर पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान आहेत. येत्या दोन आठवड्यात मी भारताला भेट देणार आहे. मी याबद्दल खूप उत्सुक आहे, असे ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

सर्वाधिक लाईक्स आणि शेअर्ससह मोदी नंबर वन
फेसबुकवर ट्रम्प दुसऱ्या क्रमांकाचे नेते असू शकतात, परंतु एका अभ्यासानुसार मागील 12 महिन्यात त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर एकूण 30.9 कोटी कमेंट्स, लाईक्स आणि शेअर्ससह पोस्ट रँकिंगच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. 20.5 कोटी पोस्टसह ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो तिसऱ्या स्थानी आहेत. चार वर्षापासून केला जात असलेल्या विश्लेषणात पहिल्यांदा जागतिक नेत्याच्या प्रत्येक फेसबुक पेजच्या प्रत्येक पोस्टला सहभागी करण्यात आले आहे. मोदींनी फेसबुकच्या सरासरीत 17 लाख चाहते आहेत. त्यांची फेसबुक कम्युनिटी 3.8 टक्के आहे.