भगवान श्री राम भक्तीचे एक अद्वितीय, आश्चर्यकारक आणि अकल्पनीय उदाहरण ‘रामनामी’ समाज

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   छत्तीसगडचा रामनामी समाज  भगवान श्री राम यांच्या भक्तीचे एक अनोखे, आश्चर्यकारक आणि अकल्पनीय उदाहरण आहे. या समाजात मंदिरात जाऊन मूर्तीपूजना करण्यास विरोध आहे, पण अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत ते उत्सुक आहे. ते मन-मंदिरात वसलेल्या रामाची भक्ती करतात. या समाजाचे लोक शरीरावर राम नाम गोंदवतात. या समाजातील लोक यात्रा व इतर कार्यक्रमांमध्ये रामचरितमानसांचे दोहों व चौपायांचे पठण करतात.

रामनामी समाजाचे लोक प्रामुख्याने छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा, रायगढ़, बालोदाबाजार-भाटापारा, महासमुंद आणि रायपूर जिल्ह्यातील जवळजवळ 100 गावात राहतात. दरम्यान, आता त्यांची संख्या केवळ 150 ते 175 च्या दरम्यान आहे. एकेकाळी त्यांची लोकसंख्या 10 ते 12 हजार होती. नवीन पिढी गोंदणे टाळते. रामनामी पंथाची सुरूवात 1890 च्या सुमारास मालखरोदा भागातील चारपारा येथे राहणारे परशुराम भारद्वाज नावाच्या युवकाने केली. जवळजवळ 130 वर्ष जुन्या या पंथाशी संबंधित लोक शरीरावर राम-नाम लिहून हा संदेश देतात कि, राम आपल्या कणा – कणात आहेत. राम- राम करूनच ते एकमेकांना अभिवादन देतात. रामनामी समाजाचे अध्यक्ष जोरापाली येथील रहिवासी रामप्यारे म्हणतात की आपण रामचरित मानसची पूजा करतो. सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम म्हणजे भजन मेळा. यात ते रामचरितमानसचे गायन करतात.

गोंदण्यानुसार निश्चित केले जाते नाव :

रामनामी संस्थेचे अध्यक्ष रामप्यारे म्हणतात की, शरीरावर राम नाम लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव गोंदणानूसार निश्चित केले जाते. जर एखाद्याच्या संपूर्ण शरीरावर राम नाम लिहिले गेले असेल तर त्यास नखशिख रामनामी म्हणतात. जो संपूर्ण कपाळावर रामनाम लिहितो त्याला सर्वांग रामनामी म्हणतात आणि कपाळावर दोन वेळा राम-नाम लिहिणाऱ्याला शिरोमणी रामनामी म्हणतात.

पाच प्रमुख ओळखः

रामनामी समाजाच्या पाच प्रमुख ओळख आहेत. पहिले भजन किंवा जैतखंभ, त्याला जयस्तंभ देखील म्हणतात. एक खांब मोठा, तर चार लहान असतात. याशिवाय मोरांच्या पंखांनी बनविलेले मुकुट, शरीरावर राम-नामाचे गोंदण, रामनाम लिहिलेले कपडे आणि पाचवा घुंगरू. भजन करीत असताना, रामनामी समाजातील लोक डोक्यावर मोराच्या पंखांचा मुकुट, अंगावर राम-नाम लिहिलेले वस्त्र आणि पायांवर घुंगरू घालतात.