Coronavirus : ‘महामारी’चा सामना करण्यासाठी ‘सार्क’ देशांनी बनवला COVID-19 फंड, ‘कंगाल’ PAK ची 3 मिलियन डॉलरची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साऊथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल को-ऑपरेशन (सार्क) ने कोरोनाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन निधी तयार करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानकडून सार्क कोविड-१९ इमर्जन्सी रिस्पॉन्स फंडमध्ये 3० लाख अमेरिकन डॉलर्सची देणगी दिल्यानंतर ते मागे हटत असल्याचे दिसते आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे की, प्रत्येक राष्ट्राचे गांभीर्य त्यांच्या व्यवहारावरून काढले जाऊ शकते.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले की, ते सार्क कोविड-१९ आपत्कालीन निधीसाठी ३० लाख अमेरिकन डॉलर्सचे योगदान देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क सदस्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान फंड तयार करण्याचा प्रस्ताव झाल्याच्या आठवड्यानंतर पाकिस्तानचे हे विधान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर सार्क देशांनी त्वरित कोविड-१९ आपत्कालीन फंड मध्ये योगदानासाठी आपली एकी दाखवली, पण पाकिस्तानकडून ही घोषणा अलीकडेच झाली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी एका विधानात म्हटले की, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंकेने देखील या निधीस सहमती दिली. ते म्हणाले की, जिथपर्यंत भारताचा प्रश्न आहे, पंतप्रधानांनी दिलेली वचनबद्धता अंतिम टप्प्यात आहे. पाकिस्तान वगळता इतर सर्व सार्क देशांनी तातडीने कोरोना व्हायरस इमर्जन्सी फंडमध्ये देणगी दिली होती.

अफगाणिस्तानने महामारीचा सामना करण्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांच्या चर्चेदरम्यान १० लाख अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले होते. नेपाळने सार्कच्या आपत्कालीन निधीला १०० मिलियन एनपीआर दिले होते, तर मालदीव सरकारने आपत्कालीन निधीसाठी २ लाख अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले होते. भूतानने १ लाख अमेरिकन डॉलर्स, तर भारताने १ कोटी अमेरिकन डॉलर्सची प्राथमिक ऑफर दिली आहे.

यादरम्यान पाकिस्तानने कोविड-१९ चा सामना करण्यासाठी सार्ककडे मदत मागितली आहे. पाकिस्तानने सार्ककडून ३ मिलियन डॉलर मदतीची मागणी केली आहे. फंडबाबत गुरुवारी परराष्ट्र सचिव सोहेल मेहमूद आणि सार्कचे सरचिटणीस एस्ला रुवान वेराकून यांच्यात फोनवर चर्चा देखील झाली.