Weather Alert : आगामी काही दिवसात वाढणार थंडी, ‘या’ ठिकाणी होऊ शकतो मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर भारतात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बदललेल्या हवामानामुळे पडलेला पारा आज आणि उद्या अधिक घसरण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील मैदानी भागातील किमान तापमानात आज २-३ अंशांची घट होऊ शकते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पर्वतीय भागात सतत बर्फवृष्टी होत असताना, मैदानाच्या राज्यांत पाऊस आणि गारपिट सुरु झाली आहे. शनिवारी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये शीतलहरीचा परिणाम दिसून येत आहे.

तसेच पश्चिम हिमालयात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या महतीनुसार, देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये जिथे थंडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे, येत्या दोन दिवसांत काही राज्यात दाट धुके असणार आहेत. तसेच अनुकूल हंगामी उपक्रमांमुळे बिहार, ओडिशा, उत्तर मध्य प्रदेश आणि उत्तर-पूर्व भारत तसेच वायव्य भागात जोरदार धुके राहणार आहे.

हवामान परिस्थितीमुळे राजधानी दिल्लीत प्रदूषणाची पातळी कमी होण्याची अपेक्षा नसल्याचे म्हंटले जात आहे. उत्तर पश्चिम भारत आणि मध्य भारतात तापमानात घट होईल, ही घट २-४ अंशांपर्यंत असू शकते. तसेच पश्चिम हिमालयी प्रदेशात पुढील तीन दिवस शीतलहरी सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण भारतात केरळ आणि माहे सोडून तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराइकल येथे येत्या २४ तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या राज्यात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रविवारी आणि सोमवारी मध्य प्रदेश व्यतिरिक्त छत्तीसगडच्या काही भागात विजेच्या कडकडात जोरदार पावसाची शक्यता आहे, तर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तर राज्यांत थंडीची लाट जाणवू शकते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like