‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागु यांच्यावर आज ‘शासकीय’ इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या अभिजात अभिनयाने सिने आणि नाट्य रसिकांच्या मनावर गेली पाच दशके अधिराज्य गाजविणारे, समाजाप्रति कृतज्ञता व्यक्त करतानाचा सामाजिक दांभिकतेवर प्रहार करणारे नटसम्राट डॉ. श्रीराम लागु यांचे मंगळवारी रात्री ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्यावर पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

श्रीराम लागु यांचे मंगळवारी रात्री घरीच ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचे पुत्र आनंद हे अमेरिकेत असल्याने ते शुक्रवारी पहाटे पुण्यात आल्यानंतर लागु यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लागु यांचे पार्थिव आज सकाळी सर्व प्रथम घरी घेऊन जाणार आहेत. त्यानंतर सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात रसिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

सुमारे एक तास तेथे अंत्यदर्शनासाठी डॉ. लागु यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  शासनाचे प्रतिनिधी म्हणून सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुभाष देसाई हे अंत्यसंस्कार प्रसंग्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/