सततच्या डोकेदुखीमुळं त्रस्त आहात ? करा ‘हे’ 9 सोपे घरगुती उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकजण सततच्या डोकेदुखीमुळं त्रस्त असतात. सर्वांच्या डोकेदुखीचं कारण हे वेगवगेळं असतं. आज आपण यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) आलेयुक्त चहा – आलेयुक्त चहा चवीसोबतच आपल्या आरोग्यालाही फायदेशीर ठरतो. या चहामुळं शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. यामुळं वेदनाही कमी होतात.

2) पाणी प्या – अनेकदा शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजेच डिहायड्रेशन झाल्यानंही डोकेदुखी होते. अशावेळी भरपूर पाण्याचं सेवन करावं. यामुळंही डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

3) लवंग – यासाठी तव्यावर लवंग शेकून घ्या. गरम असतानाच ही लवंग रुमालात बांधून घ्या. रुमालातून येणाऱ्या गरम लवंगचा वास घेत रहा. यामुळं डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

4) अ‍ॅक्युप्रेशर करा – हा अनेक आजारांवरील उपाय आहे. अंगठा आणि तर्जनी म्हणजेच पहिल्या बोटाच्या मधल्या भागात असलेल्या स्नायूंवर एक मिनिटांपर्यंत दाबा. अशा प्रकारे स्नायूंवर योग्य प्रमाणात दाब दिल्यानं डोकेदुखीपासून सुटका मिळेल.

5) लिंबू पाणी – शरीरातील आम्लांचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर तेव्हाही डोकेदुखी होते. अशात डोकं दुखत असेल तर लिंबू पाणी प्यावं. यात थोडं मीठ किंवा खाण्याचा सोडा घालावा.

6) कलिंगड – डोकं दुखत असेल तर पाणीदार फळांचं सेवन करावं. यात कलिंगड, द्राक्षं, खरबूज अशा फळांचा समावेश असावा. परंतु शक्यतो कलिंगडाचं सेवन करावं. कलिंगडात नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात पाणी असतं. कलिंगडामुळं डिहायड्रेशनदेखील दूर होतं आणि शरीराला थंडावाही मिळतो. यामुळं शरीरातील पाण्याची पातळीही स्थिर राहते.

7) स्ट्रेचिंग – जर नसा किंवा स्नायूंवर ताण आला तरीही डोकं दुखू लागतं. यात काही वेळा पाठीचा वरचा भाग, मान, खांदे, यांच्यावर ताण पडल्यानं डोकं दुखतं. अशात जर डोकं दुखत असेल तर मानेची स्ट्रेचिंग करावी. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली फिरवावी. यामुळं स्नायूंची हालचाल होते आणि ते मोकळे होतात.

8) दीर्घ श्वास घ्या आणि सोडा – ऑक्सिजनची कमतरता हेही एक डोकेदुखीचं कारण असू शकतं. अशावेळी जास्त झाडं असणाऱ्या ठिकाणी फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना मोठ्यानं श्वास घ्यावा आणि सोडावा. यामुळं ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळेल आणि डोकेदुखी कमी होईल.

9) बर्फाचा शेक – डोक्यामधील नसांना सूज आल्यानंही डोकं दुखू शकतं. अशात कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागात बर्फाचा शेक दिला तर फरक पडतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like