‘नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ लोककलावंत आणि ‘नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांचे निधन झाले. लोक गीतांनी आणि भक्ती गीतांसाठी छगन चौगुले हे महाराष्ट्रात ओळखले जात आहेत. छगन चौगुले यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात नेल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

छगन चौगुले यांनी असंख्य भक्तीगीते गायली आहेत. त्यांची नवरी नटली हे गाणे अफाट लोकप्रिय झाले आहे. आई भवानीच्या दरबारात, खंडोबा जागरण, काळुबाई भक्ती गीते, अंबाबाई तुळजापूर अशी त्यांची अनेक भक्तीगीते आणि कार्यक्रम राज्यात सर्वत्र होत असत.