Navi Mumbai ACB Trap | 15 हजार लाच घेताना सिडको कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यासह निवृत्त अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इन्टरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर (Internal Quality Audit Report) सही करण्यासाठी 15 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) नवीन पनवेल सिडको (New Panvel CIDCO) कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यासह (Superintending Engineer) निवृत्त सहायक कार्यकारी अभियंता (Retired Assistant Executive Engineer) यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Navi Mumbai ACB Trap) रंगेहात पकडले. नवी मुंबई एसीबीने (Navi Mumbai ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.23) दुपारी चारच्या सुमारास नवीन पनवेल सिडको कार्यालयात सापळा रचून केली.

 

अधीक्षक अभियंता प्रकाश बालकदास मोहिले Prakash Balakdas Mohile (वय-57) आणि निवृत्त सहायक कार्यकारी अभियंता संजय हरिभाऊ डेकाटे Sanjay Haribhau Decate (वय-58) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत सब कॉन्ट्रॅक्टर (Sub Contractor) यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Navi Mumbai ACB Trap) 15 सप्टेंबर रोजी तक्रार केली होती.

 

तक्रारदार हे सब कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी नवीन पनवेल येथील सिडको नोडल ऑफिसचे संरचनात्मक दुरुस्ती केलेल्या कामाचे बिल मंजुरीसाठी (Bill Approval) आवश्यक असणारे इंटरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर मोहिले यांची सही आवश्यक होती. मोहिले यांनी सही करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नवी मुंबई एसीबीकडे तक्रार केली.

 

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची 16 सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता, मोहिले यांनी तक्रारदार यांच्या ऑडिट रिपोर्टवर सही करण्यासाठी त्यांना पाहिजे असलेल्या लाचेच्या रक्कमे संदर्भात डेकाटे यांच्याशी बोलण्यास सांगितले. यावरुन मोहिले यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. 20 सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणीत डेकाटे यांनी मोहिले यांनी सांगितल्यानुसार 15 हजार रुपये लाचेची मागणी केली.

मोहिले यांनी सांगितल्याप्रमाणे 15 हजार रुपये लाच मागितल्याने सिडको कार्यालयात पथकाने सापळा रचला.
सिडको कार्यालयात चारच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून
15 हजार रुपये लाच घेताना डेकाटे यांना रंगेहात पकडण्यात आले.
यानंतर डेकाटे यांना लाच घेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मोहिले यांना नवीन पनवेल सिडको कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.
त्या दोघांवर खांदेश्वर पोलीस ठाण्यात (Khandeshwar Police Station)
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले (SP Punjabrao Ugale),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar)
यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पथकाने केली.

 

Web Title :- Navi Mumbai ACB Trap | Retired engineer along with superintendent engineer
in CIDCO office caught in anti-corruption net while taking 15 thousand bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा