Pankaja Munde | पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पूर्ण, नगर-आष्टी रेल्वेमार्गाला गोपीनाथ मुंडेंचे नाव.., पंकजा मुंडेंचं मोठं विधान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – नगर-आष्टी  रेल्वेमार्गाचे (Nagar-Ashti Railway) श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) जाते. बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Constituency) प्रचारादरम्यान गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. हे आश्वासन आज पूर्ण झाले, असे म्हणत आज पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान मोदींचे कौतूक केले. या रेल्वेमार्गाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी करणार नाही, असेही पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.

 

बीडमध्ये आज नगर-आष्टी रेल्वेमार्गाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, हा मार्ग रेल्वे विभागासाठी फायद्याचा नाही. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिंब्यामुळे हा रेल्वेमार्ग जनतेच्या सेवेसाठी तयार करण्यात आला.

 

पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुढे म्हणाल्या, बीडच्या स्वाभिमानी माणसासाठी हा रेल्वेमार्ग भेट आहे. हा रेल्वे मार्ग मुंबई ते परळीपर्यंत व्हावा. दरम्यान, नगर-आष्टी या 66 किलोमीटरच्या मार्गामुळे मराठवाड्यातील जनतेचा प्रवास सुकर होणार आहे. या मार्गाचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज पार पडला.

 

 

 

 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (NCP Leader Dhananjay Munde) यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, माझ्यासह बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याची नगर-बीड-परळी रेल्वे आजपासून आष्टी पर्यंत धावणार आहे.
जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून याबाबत मनस्वी आनंद आहे.
यासाठी योगदान देणारे गोपीनाथराव मुंडे, विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh),
बीड रेल्वे कृती समितीचे सर्व सदस्य यांचे आज स्मरण होत आहे.

 

 

 

Web Title :- Pankaja Munde | nagar ashti railway route inaugurated in beed today
credit goes to pm narendra modi said pankaja munde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा