आई राजा उदो उदो…. PM नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे यंदा सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव  (navratri festival) देखील साधेपणात साजरा होत आहे. शनिवारी (दि. 17) राज्यात भवानी माता, महालक्ष्मी, चतुश्रृंगी- सप्तसृंगी आदी मंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अभिषेक आणि घटस्थापना करण्यात आली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आपल्या ट्विटरवरून देशवासीयांना नवरात्री (navratri festival) ची शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यशासनाने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवाची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार यंदा सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे निय़मावलीचे पालन करत देवस्थानतर्फे साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. राज्यातील प्रमुख देवस्थान मंदिरातही यंदा गर्दी टाळून उत्सवाला परवानगी दिली आहे. नवरात्रोत्सवात कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची तुळजाभवानी मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी मोठी गर्दी होते.

मात्र यंदा देवस्थानतर्फे भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे. तसेच काही सार्वजनिक मंडळाकडून भाविकांसाठी ऑनलाईन लाईव्ह दर्शन तर ही मंडळे संकेतस्थळावर फोटो उपलब्ध करून देणार आहेत.नवरात्रोत्सवात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमाचे आयोजन आदी केले जाणार आहे. नवरात्रात विविध मंडळातर्फे आरोग्याचा जागर होणार आहे.