‘घूमकेतू’नंतर आता ‘बोले चूडियां’ सिनेमादेखील OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लॉकडाऊनमुळं अनेक सिनेमे ऑनलाईन रिलीज होताना दिसत आहेत. आयुष्मान खुराना आणि बिग बी अमिताभ बच्चन स्टारर गुलाबो सिताबो ते विद्या बालनचा शकुंतला देवी असे अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिजिटली रिलीज केले जाणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा घूमकेतू हा सिनेमा 22 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यानंतर आता अशी माहिती समोर आली आहे की, नवाजुद्दीन आणि तमन्ना भाटिया स्टारर बोले चूडिया हा सिनेमा डिजिटली रिलीज करण्याचा निर्णय झाला आहे.

सिनेमाचे प्रोड्युसर राजेश भाटिया हे बोले चूडिया सिनेमा ऑनलाईन रिलीज करण्याचा विचार करत आहे असं सजतंय. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा सिनेमा एकाच वेळी 200 देशात पोहोचणार आहे. राजेश भाटिया यांनी सांगितलं की, अनेक प्लॅटफॉर्मसोबत बातचित सुरू आहे.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर बोले चूडिया या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया लिड रोलमध्ये आहे. एका बांगड्या विकणाऱ्याची ही स्टोरी आहे जो नंतर बांगड्यांचा कारखाना सुरू करतो.