NCB Raid | एनसीबीचा समुद्रातील क्रुजवर सुरू झालेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा; IPS अधिकारी ताब्यात?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCB Raid | समुद्रात प्रथमच एनसीबीने कारवाई करुन एका क्रुजवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला आहे. त्यात एक आयपीएस अधिकारी या पार्टीत आढळून आला आहे असे वृत्त अनेक TV चॅनेलवर दाखविण्यात येत आहे. एनसीबीने एकूण २२ जणांना ताब्यात घेतले असून ८ जणांवर अटकेची प्रक्रिया सुरु केली (NCB Raid) आहे.

मुंबईहून गोव्याला जाणारया एका आलिशान क्रुजवर फॅशन शोच्या नावाखाली ही ड्रग्ज पार्टी सुरु होती. त्याचा अंमली विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. या क्रुझवर जवळपास 1500 लोक होते. त्यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीतील व्यापार्‍यांचा समावेश आहे.

 

एनसीबीच्या अधिकार्‍याने (NCB Raid) सांगितल्यानुसार क्रुझवर अजूनही तपास सुरु आहे.
क्रुझवरच्या अनेक खोल्यांचा शोध घेण्यात आला. या छाप्यात मेफेड्रोन, कोकेन, हॅशिश, एमडी अशी चार प्रकारची ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत.
हे क्रुझ आजपासून मुंबईपासून गोव्याला 3 दिवसांसाठी रवाना होणार होते.
मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकार्‍यांनी प्रवासी म्हणून या क्रुझमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर क्रुझ समुद्रात गेल्यानंतर पार्टीला सुरुवात झाल्यावर हा छापा टाकण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात ड्रग्ज घेतलेल्या 22 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी 8 जणांच्या अटकेची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
या सर्वांना रविवारच्या सुट्टीच्या कोर्टात हजर केल्यानंतरच त्याविषयीही अधिक माहिती समोर येणार आहे.
पार्टीचे तिकीट 80 हजार रुपये दिल्लीतील एक कंपनी नामस्क्रे अनुभव (Namascray Experience ) या नावाच्या दिल्लीतील कंपनीने या हायप्रोफाईल पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे तिकीट 80 हजार रुपये होते. क्रुझवर तीन दिवसांचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. (NCB Raid).

NCB च्या पथकाने एका IPS अधिकाऱ्याला ताब्यात घेतले असल्याचे वृत्त अनेक TV चॅनेल वर दाखविण्यात येत आहे.
मात्र, याबाबत NCB कडून अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Web Title :- NCB Raid | mumbai cruise drugs party rave party ncb IPS officer detained?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | महात्माजींना स्मरून लोकशाही, संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Diseases that are hard to diagnose | डॉक्टरांना देखील होत नाही ‘या’ 7 आजारांचं सहजपणे ‘निदान’, जाणून घ्या

SP Leader Ghalib Khan | गांधीजींची मूर्ती पकडून ‘बापू-बापू’ म्हणत रडू लागले ‘सपा’ नेते गालिब, Video पाहून लोक म्हणाले – ‘ऑस्करमध्ये पाठवा’