…म्हणून मीही 4 वेळा उपमुख्यमंत्री झालो, अजित पवारांची ‘फटके’बाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसे का असेना परंतु मी चार वेळा उपमुख्यमंत्रिपद पाहिलं आहे. पवारसाहेब चार वेळा मुख्यमंत्री होते म्हणून मी देखील चार वेळा उपमुख्यमंत्री झालो असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. बारामतीमधील माळेगाव सहकारी कारखान्यात पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अजित पवारांच्या वक्तव्यानं सभेत हशा पिकल्याचं दिसून आलं.

या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी मागील सरकारचा समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, “तुमची राज्यात सत्ता होती. तसेच तुमच्या विचाराचे मंत्री होते. तुम्ही अशा पद्धतीनं राजकारण करू पहात असाल तर आम्ही पण चार वेळा उपमुख्यमंत्रिपद पाहिलेले लोक आहोत. कसे का असेना परंतु आम्ही पण चार वेळा उपमुख्यमंत्रीपद पाहिलेले आहे.” यानंतर सभेत एकच हशा पिकला.

पुढे बोलताना अजित पवारांना ठसकाही लागला. यानंतर त्यांनी पाणी मागवून घेतलं आणि यानंतर ते म्हणाले, “आपले विरोधक म्हणतील पाणी पेईपर्यंत बोलत होता.”

माळेगाव सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत आपल्या ताब्यात घ्यायचा असा चंगच अजित पवारांनी बांधला आहे. अजित पवार म्हणाले, “मागील पाच वर्षांपासून आपले नेते शरद पवार हे माळेगाव कारखान्यात गेले नाहीत. त्यांनी सन्मानानं कारखान्यात जावं अशा पद्धतीचं काम करायचं आहे.” असंही ते यावेळी म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like