‘घराची रेकी झाली… माझी हत्या करण्याचे ठरले’ : जितेंद्र आव्हाड

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरु असताना ठाण्यातील एका तरुणाने मारहाणीचा गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या चर्चेत आहेत. ’जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहिल्याने त्यांच्या कार्यकर्ते आणि पोलिसांनी आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून मला मला मारहाण केली,’ असा आरोप संबंधित तरुणाने केला.

त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणानेही वेग धरला आहे. भाजपने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करा, अशी मागणी केली. तसंच भाजपच्या इतर नेत्यांनीही आव्हाडांवर जोरदार टीका केली. या सर्व टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी दु:ख जाहीरपणे मांडले आहे.आव्हाड यांनी एक ट्वीट केले असून त्यांना सोशल मीडियावर देण्यात येत असलेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तसेच आपल्या भावनाही त्यांनी मांडल्या आहेत. ’हे मी पाच वर्ष भोगले…घराची रेकी झाली…कुणी केली… हत्या करण्याचे ठरले…कोण होते त्यात…असो…आईचे आशीर्वाद…पोलीस कारवाई करतील यावर,’ असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1248092764614656005

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनी अभियंत्याला उचलून बंगल्यावर आणून बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हे उपस्थित होते आणि त्यांच्यादेखत ही मारहाण केली गेली,’ अशी तक्रार ठाण्यातील तरुणाने केली आहे. हा तरूण पेशाने इंजीनिअर असून तो संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याला माझ्या देखत आणि माझ्या माणसांनी मारहाण केलीये अशी तक्रार केली त्याला मी ओळखत नाही. माझ्या विरोधात गेली 3 वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी सतत 24 तास माझ्या मतदार संघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण हा प्रकार मला मीडिया मार्फत कळाला असा खुलासाही त्यांनी केला.