टीका करणे हाच सध्या विरोधी पक्षाचा अजेंडा : आ. रोहित पवार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाप्रमाणे विरोधी पक्षावर देखील खूप मोठी जबाबदारी असते. सरकार कुठं कमी पडत असेल तर त्या गोष्टी लक्षात आणून देऊन विरोधी पक्ष भूमिका सक्षमपणे पार पडू शकतात. राजकीय पक्ष राजकारण करणारच, पण राजकारण करण्याचीही एक योग्य वेळ असते. मात्र, राज्यातील विरोधी पक्षाकडून फक्त टीका करणे हा एकच अजेंडा आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

राज्यावर अथवा देशावर गंभीर संकट असेल तेंव्हाही राजकारण केले जात असेल तर ते दुर्दैव आहे. आज राज्यात कोरोनाच्या संकटाने उग्र रूप धारण केल असून सरकार, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस अशा सर्वच यंत्रणा मोठ्या जिकिरीने लढा देत आहेत. परंतु दुर्दैवाने राज्यातील विरोधी पक्ष प्रत्येक गोष्टीचे राजकारण करत असून फक्त विरोधाला विरोध करताना दिसत आहे . अधिवेशनात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून केलेले, विरोधी पक्षाचे सदस्य काय घोषणा देत असतील तर घरी बसवून सरकार चालवणार्‍या मुख्यमंत्र्यांचा निषेध ! हे योग्य नाही. पंतप्रधानही कार्यालयात बसून कामकाज करतात, पण त्यांच्यावर आम्ही टीका केली नाही आणि करतही नसल्याचे पवार यांनी सांगितले.