‘या’ कारणामुळं दिल्लीतील काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द, खासदार सुनील तटकरेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना दिल्लीत एका मागोमाग एक अशा अनेक घडामोडी होताहेत त्यातच सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर महत्वाची समजली जाणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दिल्लीतील बैठक रद्द झाली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले होते. मात्र राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत खुलासा केला आहे.

आज काँग्रेसच्या दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांची जयंती आहे त्यामुळे अनेक काँग्रेस नेते व्यस्त असणार आहेत म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही बैठक रद्द करण्यात आली असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. मात्र ही बैठक उद्या होणार असून या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील हे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे राज्यातील आणि केंद्रातील महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत.

त्यांना 100 जन्म घ्यावे लागतील
शरद पवारांच्या कालच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेमध्ये काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, ज्या लोकांना महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन व्हावं, असं वाटत नाही ते खोट्या बातम्या पसरवत आहेत. मोदी-शहा समजून घेण्यासाठी तुम्हाला 25 जन्म लागलीत, असं भाजपच्या एका नेत्याने मला म्हटलं होतं. आता मी यांना म्हणतो की शरद पवार समजून घेण्यासाठी तुम्हाला 100 जन्म लागतील अशा प्रकारचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते तसेच राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होणार असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com