राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज (बुधवार) शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बरोरा यांना शिवबंधन बांधले. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेने इतर नेते आणि पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. आ. बरोरा यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे काल सुपूर्द केला होता. बरोरा हे शिवसेनेत प्रवेश करणार हे कालच स्पष्ट झाले होते.

शहापूरहून तब्बल १०० हून अधिक गाडयांचा ताफा घेवुन आ. बरोरा हे मुंबईत गेले होते. आपल्यासह राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते मोठया संख्येने शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आ. बरोरा यांनी सांगितलं होतं. आ. बरोरा यांच्या शिवेसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्‍का बसला आहे.

पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाला त्यांचे चलुत भाऊ भास्कर बरोरा यांनी विरोध दर्शविला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत भास्कर बरोरा विरूध्द पांडुरंग बरोरा या सामना रंगु शकतो. दरम्यान, पांडुरंग बरोरा यांच्या प्रवेशाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचाही विरोध आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

You might also like