कर्जमाफीवरून रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा केली. यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपने यावर टीका करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन देण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले. एवढेच नाही तर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील याचे स्वागत केले.

विरोधकांनी केलेल्या आरोपांचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, विरोधक आरोप प्रत्यारोप करणारच. त्यांनीही कर्जमाफी केली होती. दीड लाखाचं कर्ज माफ केले होते. पण त्यावरील व्याज भरले तरच कर्जमाफी होणार होती. त्यामुळे ती योजना यशस्वी झाली नाही. काही शेतकऱ्यांनी दीड लाखापेक्षा अधिक असणारे कर्ज भरले मात्र अजूनही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यांनी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे केले.

रोहित पवार पुढे म्हणाले, वेगवेगळ्या कागदपत्रावर सह्या करण्यास भाग पाडले. कर्जमाफीचा जीआर तीस वेळ बदलला. अशाप्रकारे मागचं सरकार अडकत अडकत चालले होते. आताच्या सरकारने सरसकट दोन लाखाची कर्जमाफी केली. 95 टक्के शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/