राज्यात ‘यंगीस्थान’चं पर्व ! रोहित पवारांचं आदित्य ठाकरेंना ‘कॉलिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनीही रोहित पवारांना शुभेच्छा दिल्या. दोघेही पहिल्यांदात निवडणुकीत उतरले होते आणि विजयी झाले. त्यांच्या फोनवरून राजकारणातील नवीन पिढी, त्यांची राजकीय संस्कृती आणि भविष्यातील महाराष्ट्रातील सक्षम राजकारण दिसून आलं. असेही समजत आहे की, रोहित पवार यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरून आदित्य ठाकरेंना फोन केला होता.

रोहित पवार कर्जत-जामखेडमधून विजयी झाले आहेत. भाजपचे मंत्री राम शिंदेंचा त्यांनी पराभव केला आहे. राम शिंदेंनीही विजयानंतर फेटा बांधून रोहित पवारांचा सत्कार केला. विजयी झाल्यानंतर रोहित यांनी राम शिंदेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आईचा आशीर्वाद घेतला. यातून राजकारणातील सुसंस्कृतपणा दिसून आला.

आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात होते. तेथून त्यांना विजय मिळाला आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे समर्थन करणारे पोस्टर लावल्याचे दिसून आले. वरळीत हे पोस्टर लावल्याचे समजत आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांना विजयाच्या शुभेच्छा असा मजकूर पोस्टरवर दिसत होता.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा