NCP MP Supriya Sule | दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाल्या-‘पाऊस पडेल का हे मी सांगू शकत नाही, आता मात्र…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MP Supriya Sule | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी बुधवारी सकाळी केलेल्या एका ट्वीटमुळे राजकीय (Maharashtra Politics News) वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार भाजपासोबत (BJP) जाणार असल्याचा दावा दमानिया यांनी केला. त्यानंतर अनेक नेत्यांकडून यासंदर्भात प्रतिक्रिया येत आहे. स्वत: अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना दमानिया यांची खिल्ली उडवली आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

अंजली दमानिया यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) म्हणाल्या, ट्विटर किंवा अंजलीताई यांना अजूनतरी या देशात स्वत:चं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचं ट्वीट मी काही वाचलेलं नाही. पण त्यांनी काही लिहिलं असेल, तर त्यांना तो अधिकार आहे.

अजित पवार खरच भाजपसोबत जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी पावसाचं उदाहरण देत सूचक विधान केलं, 15 मिनिटांनी इथे मुळशीत पाऊस पडेल का? याचं उत्तर माझ्याकडे नाही. आत्ता उन आहे हे मी सांगू शकते. पण 15 मिनिटांनी पाऊस पडेल की नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आज मंत्रालयात (Mumbai Mantralaya) कामानिमित्त गेले होते.
तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद
होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहे… तेही लवकरच.
त्या पुढे लिहितात, महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत आणि तेही लवकरच असंट ट्विट अंजली दमानिया यांनी केलं होतं.
या दाव्यावर अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता ते म्हणाले,
एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे,
असे म्हणत अजित पवार यांनी दमानिया यांच्या ट्विटची खिल्ली उडवली आहे.

Web Title :-  NCP MP Supriya Sule | supriya sule mocks anjali damania claim on ajit pawar joining bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’

Deepak Kesarkar | ‘दमानियांना मी उत्तर द्यायला लागलो तर…’, अजित पवारांच्या भाजपासोबत जाणाच्या वक्तव्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया